ETV Bharat / bharat

प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असल्यानेच धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले -एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा

लखनौ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार आणि आमदारांसह, शनिवारी उत्तर प्रदेशच्या लखनौला पोहोचले आहेत. ते आज लखनौमधील विविध मंदिरांना भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा
CM Eknath Shinde visit Ayodhya
author img

By

Published : Apr 9, 2023, 7:50 AM IST

Updated : Apr 9, 2023, 10:46 AM IST

लखनौ - प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच आम्हाला धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेे आहे. ते लखनौहून अयोध्येला जाताना माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद

उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की आमची भेट राजकीय भेट नाही. मी अयोध्येला भेट देत असतो. पण मुख्यमंत्री म्हणून येथे पहिल्यांदाच आलो आहे. प्रभू राम यांचे सर्वांनाच आशीर्वाद घ्यायचे होते. मला योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे आभार मानायचे आहेत. कारण, ते आमचे स्वागत करण्यासाठी येथे आले आहेत.

  • #WATCH | "Lord Ram's blessings are with us and that is why we have got the symbol of bow and arrow," says Maharashtra CM Eknath Shinde as he leaves for Ayodhya from Lucknow pic.twitter.com/NdQ36RXoDd

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

योगी व पंतप्रधानांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले एकनाथ शिंदे विशेष विमानाने चौधरी चरणसिंग विमानतळावर सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचले. उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने जलशक्ती मंत्री स्वतंत्र सिंह त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर आले होते. स्वागतानंतर मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. श्री रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर व्हावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमध्ये बाळासाहेबांच्या काळापासून वैचारिक युती आहे. आमच्यामध्ये एक नैसर्गिक युती आहे. ही युती खूप पुढे जाणार आहे.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

राम लल्लाशी आमचे जुने नाते अयोध्येत साधूंनी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार व मंत्री सहभागी होणार आहेत. कारसेवकांसोबत चांदीची वीट पाठविली, त्यामुळे राम लल्लाशी आमचे जुने नाते आहे. आम्ही मंदिरालाही भेट देणार आहोत. पूर्वी पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, पण आता आम्ही आमच्या साधूंचे रक्षण करू, असे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत माध्यमांशी म्हटले होते. शिवसेना नेत्यांनी विमानात बसून मुंबईहून निघण्यापूर्वी जय श्री राम, जय शिवाजी आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

असा असेल आजचा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम मुख्यमंत्री रविवारी श्री राम कथा हेलिपॅड पार्क, अयोध्येकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर कारने हॉटेलमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री हॉटेलमधून राममंदिराकडे कारने रवाना होणार असून राम मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या जागेलाही भेट देणार आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर अयोध्येला जायचे होते. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज भेट घेणार आहोत.

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी अयोध्या भगवीमय; शहरभर लागले बॅनर्स!

Last Updated : Apr 9, 2023, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.