ETV Bharat / bharat

Arvind Kejriwa: पंतप्रधान निरक्षर हा गुन्हा नाही! मात्र, नालीच्या गॅसपासून चहा बनवण्याचे उदाहरण कसे योग्य? -केजरीवाल - पंतप्रधान निरक्षर अरविंद केजरीवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दंड ठोठावला आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री केजरीवाल यांची पत्रकार परिषदेत झाली. त्यामध्ये देशातील जनता पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करू शकत नाही, असा गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश काल आला आहे. संपूर्ण देशाला याचा धक्का बसला आहे कारण आपण लोकशाहीत राहतो. प्रश्न विचारण्याचे आणि माहिती घेण्याचे स्वातंत्र्य असावे. असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.

Arvind Kejriwa
Arvind Kejriwa
author img

By

Published : Apr 1, 2023, 9:20 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २१व्या शतकातील पंतप्रधान सुशिक्षित असावेत की नाही हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे की पंतप्रधानांच्या पात्रतेबाबत माहिती घेऊ शकत नाही. या आदेशानंतर संपूर्ण देश हादरला आहे. कारण आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत प्रश्न विचारण्याचे, माहिती विचारण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कुणी कमी शिकलेला असणं हा गुन्हा नाही, कुणी अशिक्षित असणं हा गुन्हा नाही. पाप नाही. आपल्या देशात गरिबी इतकी आहे की अनेकांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही असही ते म्हणाले आहेत.

सुशिक्षित पंतप्रधान असे बोलत नाहीत : मी पंतप्रधानांच्या अभ्यासाची ही माहिती का मागितली, असे केजरीवाल म्हणाले. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. देशाला पाहिजे तशी प्रगती करता आली नाही. आज लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे, लोकांना खूप वेगाने प्रगती करायची आहे. २१व्या शतकातील तरुणांना प्रगती हवी आहे. त्यांना रोजगार हवा आहे, महागाईपासून मुक्ती हवी आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी सुशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो की, पंतप्रधानांची काही विधाने अशी येतात की देश खवळतो. नाल्यातून बाहेर पडणारा वायू चहा बनवण्यासाठी ऊर्जा म्हणून वापरता येतो. सुशिक्षित पंतप्रधान असे बोलत नाहीत. पंतप्रधानांना विज्ञान माहीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नोटाबंदीमुळे देश 10 वर्षे मागे गेला : कॅनडात गणिताचे छोटेसे सूत्र सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना ग्लोबल वॉर्मिंगबद्दल सांगत होते, आणि म्हणाले ते काही नाही. मुलं त्याच्याकडे बघून हसत होती. अशा परिस्थितीत देशाचा पंतप्रधान शिक्षित असावा की नसावा, असा व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये ते प्राथमिकपर्यंत शिकल्याचे सांगत होते. वाचणे आणि लिहिणे महत्वाचे का आहे. कारण पंतप्रधानांना देशासाठी अनेक फायलींवर सह्या कराव्या लागतात. त्यांचे शिक्षण झाले असते तर जीएसटीची योग्य अंमलबजावणी झाली असती, नोटाबंदीमुळे देश 10 वर्षे मागे गेला. कोणीही त्याला मूर्ख बनवू शकतो आणि त्याची सही घेऊ शकतो. 60 हजार शाळा बंद झाल्या.

देशातील सर्वात मोठे व्यवस्थापक शिक्षित असावेत : केजरीवाल म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधानांच्या शिक्षणावर शंका उपस्थित केली आहे. अमित शहा यांनीही अनेक वर्षांपूर्वी पदवी दाखवली होती. गुजरात विद्यापीठ पदवी का देत नाही. पहिला प्रश्न त्यांची पदवी बनावट आहे, दुसरा प्रश्न आहे की ते पंतप्रधान आहेत, मग त्यांनी पदवी का दाखवावी. तर गुजरात विद्यापीठाने आपला विद्यार्थी पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा करायला हवा. एकविसाव्या शतकात देशातील सर्वात मोठे व्यवस्थापक शिक्षित असावेत की नाही हा माझा प्रश्न आहे. संपूर्ण देशासमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा : PM Modi: माझी कबर खोदण्यात देशातीलच नाही तर परदेशातील लोकांचाही सहभाग -पंतप्रधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.