ETV Bharat / bharat

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी ढगफुटी: 5 जण जखमी

प्राथमिक माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांसमवेत पोलीस प्रशासन हे मदत कार्य करण्यासाठी कार्यरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यासाठी काम सुरू केले आहे.

मोठी ढगफुटी
मोठी ढगफुटी
author img

By

Published : Sep 20, 2021, 6:27 PM IST

देहराडून- उत्तराखंडमध्ये मोठी ढगफुटी झाल्याची घटना घडली आहे. चमोली जिल्ह्यातील नारायणबगड ब्लॉकमधील पंगती गावात ढगफुटी झाली. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजता घडली आहे. ढगफुटीनंतर गावात मोठे नुकसान झाले आहे. अनेक वाहने, मजुरांचे घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 5 वाजता डोंगरात ढगफुटी झाली झाली आहे. या घटनेत 33 केव्ही वीज उपकेंद्राजवळ राडारोडा वाहून आला आहे. त्यामुळे ग्वालदम-कर्णप्रयाग राष्ट्रीय महामार्गावर रांगेत उभे असलेल्या वाहनांमध्ये राडारोडा व पाणी वाहून आले. स्थानिक भागामध्ये मजुरांसाठी कॉलनी आहे. या कॉलनीमधील घरांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी ढगफुटी

हेही वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग

कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर नाही-

प्राथमिक माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांसमवेत पोलीस प्रशासन हे मदत कार्य करण्यासाठी कार्यरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यासाठी काम सुरू केले आहे. पोलीस स्टेशनमधील अधिकारी ध्वजवीर सिंह पवार म्हणाले, की नारायणबगड पंगती गावामध्ये पहाटे साडेपाच वाजता ढगफुटी झाली आहे. ही घटना स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी माहिती घेतली आहे. कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-चरणजितसिंह चन्नी पंजाबचे नवे कॅप्टन, विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

ढगफुटीत 3 लोक जखमी

प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मजुरांना मदत पोहोचविली आहे. ढगफुटीत 3 लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी एसडीआरएफ आणि प्रशासनाचे पथक मदतकार्य करत आहे.

हेही वाचा-दिव्यांगांकरिता घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

55 गावांचा जिल्ह्याशी तुटला संपर्क

मुसळधार पावसामुळे नंदप्रयाग घाट मोटरमार्गासह सेरा गावाला फटका बसला आहे. त्यामुळे तेथील वाहतुकीला अडथळा आला आहे. रस्ता बंद असल्याने घाट भागामधील 55 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.