ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : जंतरमंतरवर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मध्यरात्री रंगला सामना, पोलिसांनी मारहाण केल्याचा कुस्तीपटूंचा आरोप - कुस्तीपटूच्या डोक्याला दुखापत

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र बुधवारी मध्यरात्री कुस्तीपटू आणि पोलिसांदरम्यान चांगलाच सामना रंगला.

Wrestlers Protest
पोलीस आणि कुस्तीपटू आमनेसामने
author img

By

Published : May 4, 2023, 7:55 AM IST

पोलीस आणि कुस्तीपटू आमनेसामने

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना बडतर्फ करण्यासाठी कुस्तीपटू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. मात्र कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बुधवारी मध्यरात्री जंतरमंतरवर चांगलाच सामना रंगला. फोल्डींग बेड आंदोलनस्थळी आणल्यानंतर पोलिसांनी आपनेते सोमनाथ भारती यांना विरोध केला. त्यामुळे पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही मद्यधुंद पोलिसांनी कुस्तीपटूंना काठीने मारहाण केल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. यात मार लागल्याने कुस्तीपटूच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Wrestlers Protest
सोमनाथ भारती यांनी केलेले ट्विट

कसा झाला जंतरमंतरवर वाद : दिल्लीतील आपचे नेते सोमनाथ भारती यांनी आंदोलन करणाऱ्या खेळाडूंसाठी फोल्डेबल बेडची व्यवस्था केली होती. मात्र पोलिसांनी हे बेड आंदोलनस्थळी नेण्यास मनाई केली. त्यामुळे खेळाडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी काही कुस्तीपटूंना काठीने मारहाण केल्याचा आरोप खेळाडूंनी केला. त्यामुळे एका कुस्तीपटूच्या डोक्याला चांगलीच दुखापत झाली. त्यामुळे वाद आणखी चिघळला.

आपनेते सोमनाथ भारती पोलिसांच्या ताब्यात : जंतरमंतरवर रात्री उशिरा झालेल्या या गोंधळाचा ट्विटरवर अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी पावसामुळे महिला कुस्तीपटूंना फोल्डेबल कॉटची गरज होती. मात्र पोलीस आत जाऊ देत नव्हते. मीही महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देत बेड आंदोलनस्थळी नेत होतो. मात्र त्यावेळी पोलिसांनी मनाई करत मला ताब्यात घेतले आहे. मला मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात येत असल्याचे ट्विट सोमनाथ भारती यांनी केले आहे.

पावसामुळे आमच्या गाद्या झाल्या ओल्या : आपच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आजच्या पावसामुळे आमच्या गाद्या ओल्या झाल्या आहेत. त्यानंतर आम्ही आतमध्ये काही लाकडी खाटा मागवल्या होत्या. पोलिसांनी त्यांना आत जाऊ न देता पैलवानांशी गैरवर्तन केल्याचे कुस्तीपटू या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट हे देखील दिसत आहेत. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

महिला कुस्तीपटूंवर रडण्याची वेळ : आम आदमी पक्षाचे आमदार रेनकोट वाटप करण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले होते. रात्री उशिरा जंतरमंतरवर हा गोंधळ सुरू झाला. दिल्ली पोलिसांच्या जवानांनी महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्याचा आरोप या खेळाडूकडून करण्यात येत आहे. यावेळी अनेक महिला कुस्तीपटू या व्हिडिओमध्ये रडतानाही दिसत आहेत. कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी काठ्या आणि रॉडने मारहाण केल्याचा खेळाडूंचा आरोप आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी या राड्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला संपूर्ण देशाच्या पाठिंब्याची गरज आहे. सर्वांनी दिल्लीत यावे. पोलीस आमच्यावर बळाचा वापर करत आहेत. पोलीस महिलांवर अत्याचार करत असून ब्रिजभूषण सिंहविरोधात काहीही करत नसल्याचे बजरंग पुनियांनी स्पष्ट केले आहे.

परवानगीशिवाय बेड आणल्याने कारवाई : जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनात आप नेते सोमनाथ भारती यांनी परवानगीशिवाय आंदोनाच्या ठिकाणी फोल्डिंग बेड आणले. आम्ही नकार दिल्यावर पैलवान आक्रमक झाले. यावेळी पैलवानांनी ट्रकमधून बेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे किरकोळ वाद झाला. पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने सोमनाथ भारती यांच्यासह 2 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी दिली आहे.

हेही वाचा - Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात! ट्रकने बोलेरोला धडक दिल्याने 10 प्रवासी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.