ETV Bharat / bharat

धक्कादायक.. लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ चीनने बसवले मोबाईल टॉवर - भारतीय सीमेवर चीनचे साहित्य

लडाखच्या चुशूलमधील नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन (Chushul Councillor Konchok Stanzin) यांनी सांगितले की, चीनच्या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ 3 मोबाइल टॉवर लावण्यात आले आहेत. हे ठिकाण भारतीय भूभागाच्या अगदी जवळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोंचोक स्टॅनझिन यांनी चिनी मोबाईल टॉवरबाबत ट्विट केले (Chinese mobile towers near hot springs) आहे.

लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ चीनने बसवले मोबाईल टॉवर

author img

By

Published : Apr 17, 2022, 10:33 PM IST

लडाख : लडाखमधून चीनच्या उचापतींचा नवा प्रकार समोर आला आहे. लडाखमधील एका नगरसेवकाने दावा केला आहे की, चीन भारतीय सीमेजवळ वेगाने सुविधा विकसित करत आहे. चुशुलमधील नगरसेवक कोन्चोक स्टॅनजिन (Chushul Councillor Konchok Stanzin) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले की, 'पॅंगॉन्ग तलावावरील पूल पूर्ण केल्यानंतर, चीनने गरम पाण्याच्या झऱ्याजवळ 3 मोबाइल टॉवर लावले (Chinese mobile towers near hot springs) आहेत'. ते म्हणाले, 'मला सरकारला आवाहन करायचे आहे की, आपल्याला चीनला उत्तर देण्याची गरज आहे. ते म्हणाले की, चीनने प्रथम नागरीकांसाठी सुविधा निर्माण केल्या आणि नंतर त्या सुविधांचा उपयोग सैन्यासाठी केला आहे. त्यामुळे भारतानेही याभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

आपल्याकडे साधी ४जी सुविधाही नाही : चुशुल, लडाख येथील नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, 'पॅंगॉन्ग लेकवरील पूल पूर्ण केल्यानंतर, चीनने भारतीय भूभागाच्या अगदी जवळ असलेल्या चिनी हॉट स्प्रिंगजवळ 3 मोबाइल टॉवर स्थापित केले आहेत.' ते म्हणाले की, 'ही चिंतेची बाब नाही का? भारतातील आमच्या मानवी वस्तीच्या गावात 4G सुविधाही नाही. माझ्या मतदारसंघातील 11 गावांमध्ये 4G सुविधा नाही. चीनच्या कारवायांना आपण गांभीर्याने घ्यायला हवे', असे ते म्हणाले. भारतातील बहुतांश सीमावर्ती गावांमध्ये 4G इंटरनेट नाही, आपण दळणवळणात मागे आहोत.

  • After completing the bridge over Pangong lake, China has installed 3 mobile towers near China's hot spring very close to the Indian territory. Isn't it a concern? We don't even have 4G facilities in human habitation villages. 11 villages in my constituency have no 4G facilities. pic.twitter.com/4AhP4TYVNY

    — Konchok Stanzin (@kstanzinladakh) April 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्टॅनझिनने भारतीय सीमेजवळील कथित चिनी पायाभूत सुविधांची काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. त्यांच्या दाव्यांबद्दल विचारले असता, ते म्हणाले, 'मी माझ्या लोकांसाठी आवाज उठवत आहे, चीनने त्यांच्या पायाभूत सुविधांचा वेग वाढवला आहे, अलीकडेच त्यांनी पॅंगॉन्गवर पूल सुरू केला आहे आणि आता अलीकडेच त्यांनी हॉट स्प्रिंग्समध्ये तीन टॉवर बांधले आहेत. त्यांचा वापर ड्रोनसाठी होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, चीन आपल्या प्रदेशावर किंवा दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी हॉट स्प्रिंग्समध्ये बसवलेल्या मोबाईल टॉवरचा वापर करू शकतो, हे लक्षात घेऊन फेब्रुवारीमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले होते की, सरकारला चीन पॅंगोंग तलावावर बांधत असलेल्या पुलाबाबत माहिती आहे. ते म्हणाले होते की, 1962 पासून चीनच्या अवैध कब्जात असलेल्या भागात हा पूल बांधला जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थेने दत्तक घेतले स्व. सीडीएस बिपीन रावत यांचे गाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.