ETV Bharat / bharat

मलाबार नौदल सरावात भारतासह चार देशांचा सहभाग; चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव

author img

By

Published : Aug 26, 2021, 5:52 PM IST

भारतीय नौदल 26 ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान अमेरिकन नौदल, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (आरएएन) यांच्यासह मलाबार 2021 सरावात सहभागी होत आहे. मलाबार सागरी सरावाला 1992 मध्ये IN-USN सराव म्हणून सुरूवात झाली. 2015 मध्ये, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स मलाबारमध्ये कायम स्वरूपी सदस्य म्हणून सहभागी झाले.

चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव
चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव

नवी दिल्ली - चीनला युद्धाची खुमखुमी असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मलाबार सागरी युद्धसरावात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार भागीदार देश (क्वाड) आज सहभागी झाले आहेत. दुसरीकडे चीनने तिबेटमध्येही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सैन्यदलाचे मोठे सामर्थ्य दाखविले आहे.

तिबेटमधील चीनकडून घेण्यात आलेल्या सैन्यदलाच्या प्रदर्शनामध्ये 10 हून अधिक ब्रिगेड आणि तिबेट लष्करी कमांडने सहभाग घेतल्याचे चीनी माध्यमाने म्हटले आहे. या सैन्यदलाच्या प्रदर्शनामध्ये सुमारे 50 हजार सैनिकांनी सहभाग घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वीच चीनने तिबेटमधून आपल्या सैन्यदलाचे प्रदर्शन दाखविले होते.

हेही वाचा-जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे

मलाबार सागरी सरावाला प्रथम 1992 मध्ये सुरुवात

भारतीय नौदल 26 ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान अमेरिकन नौदल, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (आरएएन) यांच्यासह मलाबार 2021 सरावात सहभागी होत आहे. मलाबार सागरी सरावाला 1992 मध्ये IN-USN सराव म्हणून सुरूवात झाली. 2015 मध्ये, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स मलाबारमध्ये कायम स्वरूपी सदस्य म्हणून सहभागी झाले. 2020 मधील सरावात रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचा सहभाग होता. या वर्षी 25 व्या मलाबार सरावाचे आयोजन पश्चिम प्रशांत क्षेत्रात अमेरिकन नौदलाद्वारे केले जात आहे.

हेही वाचा-Breaking - आग्री पाडा येथील अनाथ आश्रमातील 22 मुले कोरोनाबाधित

भारतीय नौदलाची जहाजे गुआम येथून निघाली आहेत. तिथे त्यांनी 21-24 ऑगस्ट 21 दरम्यान आयोजित ऑपरेशनल टर्न अराउंडमध्ये भाग घेतला होता. यावेळी पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ऍडमिरल एबी सिंह, AVSM, VSM यांनी अमेरिकन नौदलाच्या समपदस्थांबरोबर विचारांचे आदानप्रदान केले आहे.

हेही वाचा-ती आली... तिने बघितले... ती उधळली... पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद

हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक दृष्टीकोनातील समन्वयाचा पुरावा

मलाबार -21 मध्ये भूपृष्ठ विरोधी, हवाई विरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती आणि इतर डावपेच आणि सामरिक कवायतींचा समावेश असणार आहे. या सरावात सहभागी झालेल्या नौदलांना परस्परांच्या कौशल्य आणि अनुभवांचा लाभ घेण्याची संधी मिळेल. कोविड -19 जागतिक महामारी दरम्यान आरोग्य विषयक नियमांचे पालन करत आयोजित केलेला सराव हे सहभागी नौदल तसेच मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक दृष्टीकोनातील समन्वयाचा पुरावा आहे.

हे अधिकारी युद्धसरावात होणार सहभागी-

भारतीय नौदलाकडून आयएनएस शिवालिक आणि आयएनएस कदमत आणि P8I गस्ती विमान सहभागी होणार आहेत. त्यांचे नेतृत्व रिअर ऍडमिरल तरुण सोबती, व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इस्टर्न फ्लीट हे करणार आहेत. अमेरिकन नौदलाचे प्रतिनिधित्व युएसएस बॅरी, युएसएनएस रॅप्पाहॅनॉक युएसएनएस बिग हॉर्न आणि P8A गस्ती विमान करणार आहेत. जपानी नौदलाचे प्रतिनिधित्व पाणबुडी आणि पी 1 गस्ती विमानाव्यतिरिक्त जेएस कागा, मुरासामे आणि शिरानुई करणार आहेत. ऑस्ट्रेलियन नौदलाचे प्रतिनिधित्व एचएमएएस वारामुंगा करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.