ETV Bharat / bharat

Rahul Rescue Operation Continues in Chhattisgarh : छत्तीसगडच्या जांजगीर चंपा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाकरिता बचाव मोहिम  सुरूच - बोअरवेल उत्खनन सुरू आहे

छत्तीसगडमधील जांजगीरमध्ये बोअरवेलमध्ये (Borewell aAccident at Janjgir in Chhattisgarh) पडलेल्या राहुलला वाचवण्यासाठी २४ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, आतापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढता आलेले नाही. बोअरवेलच्या समांतर 50 फुटांपेक्षा जास्त खोदकाम (Excavation of Borewells Over 50 Feet) करण्यात आले आहे. सुमारे 60 फूट खोदकामात राहुल अडकला आहे. आता राहुलला वाचवण्यासाठी रोबोटचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरू आहे.

Odisha NDRF and SDRF squad during rescue operation
ओडिशाचे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करताना
author img

By

Published : Jun 11, 2022, 8:01 PM IST

जांजगीर चंपा : जांजगीरमधील मालखरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिह्रिड गावात 12 वर्षीय बालक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहुल साहू नावाचा हा मुलगा घरामागे खेळत होता. यादरम्यान तो घसरला आणि बोअरवेलमध्ये पडला. राहुलला बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेले नाही. ओडिशाचे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक जिल्हा प्रशासनासह बचाव कार्यात गुंतले आहेत. राहुलला वाचवण्यासाठी रोबोटचीही मदत घेतली जाणार आहे. आरोग्य विभाग आणि तज्ज्ञांची टीम कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुलाच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

ओडिशाचे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य

मुलगा बोअरवेलमध्ये कधी आणि कसा पडला : राहुल साहू असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वय सुमारे 12 वर्षे आहे. तो जांजगीर-चंपा जिल्ह्यातील मलखारोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पिह्रिड गावात राहतो. खेळता खेळता मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हे बालक त्यांच्या घरामागील बारीमध्ये खेळत होते. यादरम्यान तो घसरला आणि बोअरवेलमध्ये पडला.

ओडिशाचे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक राहुलचे आईवडीलांबरोबर

बोअरवेल कोणाचा आहे : ही बोअरवेल राहुलच्या वडिलांनीच खोदली होती. राहुलचे वडील लाला साहू यांनी त्यांच्या घरातील बारीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुमारे 120 फूट बोअर केला आहे. केसिंग बसवण्यात आले, मात्र बोअरमध्ये बिघाड झाल्याने तो बोअर बंद झाला आणि त्याचे केसिंग पाईपही काढण्यात आले. बोअर 6 ते 8 इंच आहे. त्याच्या कुंपणात खेळत असताना राहुल या बोअरच्या आत पडला.

हेही वाचा : मध्य प्रदेश : दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रह्लादला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.