ETV Bharat / bharat

Mamata letter To Opposition : पाच राज्यांतील अपयश! एकत्र येण्याबाबत विरोधी पक्षांना ममतांचे पत्र - Mamata's appeal to opponents to come together

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही यश मिळाले नाही. त्यामुळे (2024)मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे. (Mamata letter To The Opposition ) दरम्यान, पच्छिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची पुन्हा मोट बांधने गरजेजे आहे अशा आशयाचे पत्र सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहले आहे.

विरोधी पक्षांनी एकत्र ऐण्याबाबत ममतांचे नेत्यांना पत्र

author img

By

Published : Mar 31, 2022, 7:22 AM IST

Updated : Mar 31, 2022, 7:37 AM IST

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणेचा बिगर भाजपशासित राज्यांमध्ये हस्तक्षेप वाढत चालला आहे. बिगर भाजपशासित राज्य सरकारांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेच्या आडून सुरू आहे. (Mamata Banerjee has written a letter) या विरोधात सर्वच विरोधी पक्षाने एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर देशभरातल्या सर्व विरोधी पक्षाने केंद्र सरकारच्या विरोधात मोहीम उठवावी अशा आशयाचे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाला लिहिले आहे.

नवीन आघाडीची मोट बांधण्याची सुरुवात - यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. लवकरच दिल्लीत यासंबंधीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात (2024)च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवीन आघाडीची मोट बांधण्याची सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेस कमकुवत होत आहे का? - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आपले अस्तित्व शोधावा लागत आहे. (Mamata's appeal to opponents to come together) तर, तिथेच पंजाबमध्ये हातातली सत्ता काँग्रेसकडून गेली आहे. तर दुसरीकडे गोव्यामध्ये देखील काँग्रेसला पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे (2024)च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय काँग्रेस देऊ शकेल का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

युपीएची सुत्र शरद पवारांकडे देण्याचा प्रस्ताव? - 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकारणीमध्ये पार पडला. त्यामुळे (2024)साठी शरद पवार यांच्याकडून विरोधकांची मोट बांधणी सुरू केली जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. बिगर भाजपशासित राज्यांमधील सरकारांना एकत्र घेऊ नवीन आघाडी तयार करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक खंबीर नेतृत्व उभे करण्याचा विचार सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांचा असल्याचे बोलले जात आहे.

विरोधी पक्षांनी एकत्र ऐण्याची गरज - काही दिवसापूर्वी याया विषायाबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून देखील बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट त्यांनी घेतली होती. त्यामध्ये त्यांनी 2024 ला विरोधी पक्षांनी एकत्र ऐण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते.

...तर शरद पवार पंतप्रधान होतील - पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने ते देशभरातील विरोधी पक्षाची जुळवाजुळव आपल्या नेतृत्वाखाली करू शकतात. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुढे चांगला पर्याय उभा राहू शकतो. याबाबत शरद पवार यांना देखील पूर्ण कल्पना असल्याने यांचादेखील पंतप्रधानपदाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच, ही आघाडी तयार करण्यात शरद पवार यांना यश आल्यास काँग्रेसलाही त्यांच्यासोबत येण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

नवीन आघाडीसाठी प्रशांत किशोर यांची जुळवाजुळव - तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, उडीसा या दहा राज्यांमध्ये जवळपास अडीशे लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी अडीचशे जागांवर दहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन रणनीती आखल्यास त्याचा मोठा फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना बसू शकतो. याबाबतची रणनीती तसेच राजकीय समीकरणे जोडण्याचा प्रयत्न राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर यांच्याकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या दहा राज्यांची राजकीय समीकरण योग्यरीत्या बसने हे देखील एक आव्हान असणार आहे.

भाजपच्या विरोधात काँग्रेस शिवाय पर्याय नाही - शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यूपीचे अध्यक्ष करण्याबाबत प्रस्ताव दिला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस शिवाय इतर कोणताही पर्याय असू शकत नाही. विरोधी पक्षात गट पडल्यास त्याचा थेट फायदा निवडणुकीत भाजपला होईल. त्यामुळे काँग्रेसचेच बळ वाढवले पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानात मोठी उलथापालथ : पंतप्रधान इम्रान खान अडचणीत, मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले

Last Updated : Mar 31, 2022, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.