ETV Bharat / bharat

छोले भटूरे विकणाऱ्याचा मुलगा बनला न्यायाधीश!, वाचा प्रेरणादायी कहानी - छोले भटूरे विकणाऱ्याचा मुलगा

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कमलेश कुमारने बिहार न्यायिक परीक्षेत (Chhola Bhatura seller son became judge in Saharsa) 64 वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. कमलेशच्या वडिलांना एकदा एका पोलिसाने थप्पड मारली होती, त्यानंतर त्याने न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला. वाचा पूर्ण बातमी..

Chhola Bhatura seller son became judge
Chhola Bhatura seller son became judge
author img

By

Published : Nov 19, 2022, 5:12 PM IST

सहरसा (बिहार) - बिहारच्या सहरसा येथील छोले भटूरे विकणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने न्यायाधीश बनून परिसरात नावलौकिक मिळवला आहे. (Chhola Bhatura seller son became judge). सहरसा येथील रहिवासी कमलेश कुमार उर्फ ​​कमल यादव न्यायिक सेवा परिक्षेत 64 वी रॅंक घेऊन न्यायाधीश बनला आहे. (Saharsa boy Kamlesh became judge). त्याचे वडील चंद्रशेखर यादव दिल्लीत छोले भटुरे विकायचे. कमलेश हा मूळचा सहरसा येथील सत्तोर पंचायतीच्या बरुवाही वॉर्ड क्रमांक 12 चा रहिवासी आहे.

सहरसा, बिहार

कमलेशच्या यशामागे वडिलांची मेहनत - कमलेशच्या यशामागे त्याचे वडील चंद्रशेखर यादव यांचे मोठे योगदान आहे. दिल्लीतील झोपडपट्टीत राहून त्यांनी छोले-भटुराचे दुकान चालवून मुलाला शिकवले आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी कमलेशचे वडील नोकरीच्या शोधात दिल्लीला गेले. तिथे ते झोपडपट्टीत राहायचे. त्यांनी मग छोले भटुरे दुकान चालवायला सुरुवात केली. 1992 मध्ये कमलेशचे वडील गावात आले आणि कुटुंबाला देखील दिल्लीला घेऊन गेले. गावात राहणाऱ्या कमलेशच्या काकांनी सांगितले की, "माझा भाचा न्यायाधीश झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही सर्व भाऊ दिल्लीला गेलो. छोले भटुऱ्याचे दुकान चालवले. तिथे राहूनच त्याने शिक्षण घेतले आणि आज तो न्यायाधीश झाला. एकदा दुकान लावत असताना त्याच्या वडिलांची पोलिसांशी बाचाबाची झाली होती. त्यावेळी लोक म्हणाले होते की, पोलिसांपेक्षा मोठा न्यायाधीश असतो. तेव्हाच कमलेशनी ठरवले होते की मोठे होवून त्याला न्यायाधीशच बनायचे आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने वडिलांना मारली होती थप्पड - कमलेशचे काका सांगतात की, कमलेश चार वर्षांचा असताना तो वडिलांच्या छोले भटुऱ्याच्या दुकानात वडिलांना मदत करत असे. दरम्यान, एके दिवशी एका पोलिसाचे वडिलांशी भांडण झाले आणि कमलेशच्या समोर पोलिसाने वडिलांना चोप दिला. यानंतर कमलेश चांगलाच संतापला होता. तेव्हा कमलेशच्या वडिलांनी सांगितले की, पोलीस हा न्यायाधीशाला सलाम करत असतो. यानंतर कमलेशने न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला आणि मेहनत करून या पदासाठी यश मिळवले.

काय म्हणतो कमलेश - आपल्या प्रवासाबद्दल कमलेश म्हणतो की, "माझे वडील अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. उदरनिर्वाहासाठी ते दिल्लीला आले. येथे ते झोपडपट्टीत राहून जीवन व्यतीत करत असे. पण दरम्यानच्या काळात सरकारने लाल किल्ल्यामागील झोपडपट्ट्या हटवण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. सर्व बेकायदा झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या. त्यावेळी मला खूप राग आला पण मी काहीच करू शकलो नाही. एके दिवशी वडिलांनी मला सांगितले की हे पोलीस न्यायाधीशांना खूप घाबरतात. ही गोष्ट माझ्या मनात घर करून बसली आणि मी न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला."

यशाचा प्रवास कठीण होता - न्यायाधीश होण्याचा मार्ग इतका सोपा नव्हता, असे कुटुंबीयांनी सांगितले. कठोर परिश्रम केल्यानंतर कमलेशने कायद्याचे शिक्षण घेतले आणि न्यायाधीश होण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, एक-दोनदा त्याला निराश व्हावे लागले, पण शेवटी हे यश त्याला मिळाले. खरं तर, कमलेश कुमार लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत आणि हा संदेश देत आहेत की परिस्थिती कोणतीही असो, माणसाने हार मानू नये.

गावाला यशाचा अभिमान - कमलेशच्या यशावर गावचे सरपंच तेज नारायण यादव म्हणतात, "कमलेश न्यायाधीश झाला याचा मला खूप आनंद आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करतो. त्यांच्या वडिलांनी छोले-भटुराचे दुकान लावून आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि न्यायाधीश बनून आमच्या गावाला अभिमान वाटावा इतके सक्षम बनवले. यासाठी मी कमलेश आणि त्याच्या वडिलांचे आभार मानतो"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.