ETV Bharat / bharat

Jagdalpur Mine Accident: जगदलपूरमध्ये मोठी दुर्घटना, खाणीत गाडले गेल्याने सात गावकऱ्यांचा मृत्यू, अनेक ग्रामस्थ खाणीत अडकले - Mine collapse in Jagdalpur

Jagdalpur Mine Accident: छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे 7 मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला आहे. Jagdalpur chhui mine laborers buried under debris

Big accident in Jagdalpur, seven villagers died due to being buried in mine
खाणीत गाडले गेल्याने सात गावकऱ्यांचा मृत्यू, अनेक ग्रामस्थ खाणीत अडकले
author img

By

Published : Dec 2, 2022, 3:49 PM IST

बस्तर (छत्तीसगड): Jagdalpur Mine Accident: चुईखडन येथे खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथे सात ग्रामस्थांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. सीएसपी विकास कुमार यांनी 7 गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. यामध्ये 6 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. Jagdalpur chhui mine laborers buried under debris

6 महिला आणि 1 पुरुष यांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली आणखी गावकरी गाडले गेल्याची शक्यता आहे. जेसीबीच्या सहाय्याने सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसडीआरएफ आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी तैनात आहेत. या खाणीत सर्व गावकरी मजूर म्हणून काम करत होते.

खाणीत गाडले गेल्याने सात गावकऱ्यांचा मृत्यू, अनेक ग्रामस्थ खाणीत अडकले

उत्खननादरम्यान अपघात झाला : जगदलपूर हे बस्तर विभागात आहे. या खाणीचे अंतर जगदलपूरपासून जवळ असल्याचे सांगितले जाते. चुई खाणीच्या दुर्घटनेत सात ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. खाणीत अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे

ढिगाऱ्यात 15 हून अधिक ग्रामस्थ गाडल्याची शक्यता : ढिगाऱ्यात 15 हून अधिक ग्रामस्थ गाडले गेल्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बस्तरच्या माझगाव परिसरात चुई खाण आहे.

बातमी अपडेट होत आहे..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.