ETV Bharat / bharat

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ-नक्षलवादी यांच्यात चकमक, 1 जवान हुतात्मा - Maoist Encounter Chhattisgarh

सीआरपीएफच्या 168 बटालियन आणि माओवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between CRPF and Naxalites ) झाली. ही चकमक जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या जंगल परिसरात झाली. हा परिसर राज्याची राजधानी रायपूरपासून 440 किमी अंतरावर आहे. यात एक कमांडर हुतात्मा ( One Commander Martyred in Chhattisgarh ) झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

छत्तीसगड
Chhattisgarh
author img

By

Published : Feb 12, 2022, 3:23 PM IST

रायपूर - छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात आज नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात ( Encounter between CRPF and Naxalites ) चकमक झाली. यात सीआरपीएफचा एक कमांडर हुतात्मा ( One Commander Martyred in Chhattisgarh ) झाला. तर एक जवान जखमी झाला आहे. सीआरपीएफच्या 168 बटालियन आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या जंगल परिसरात झाली. हा परिसर राज्याची राजधानी रायपूरपासून 440 किमी अंतरावर आहे. ही माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली.

बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक, सुंदरराज पी यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, माओवाद्यांनी गोळीबार केला. तेव्हा सीआरपीएफ बटालियन रस्ता सुरक्षा कर्तव्यावर होती. नक्षलवाद्याच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट एसबी तिर्की हुतात्मा झाले.

असिस्टंट कमांडंट एसबी तिर्की हे झारखंडचे रहिवासी होते. नक्षलवादी हल्ल्यातील आणखी एका सुरक्षा जवानाची ओळख अप्पाराव अशी झाली आहे. जखमी जवानांची प्रकृती आता स्थिर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. घटनास्थळी आणखी फौजफाटा पाठवण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे. तर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - IPL Auction 2022 : ह्यूज एडमिड्स यांना भोवळ आल्याने लिलाव थांबला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.