ETV Bharat / bharat

Chhattisgarh Election 2023 : एक लाखांवर अंत्यसंस्कार करणारा अनोखा उमेदवार विधानसभा रिंगणात - छत्तीसगडच्या वैशाली नगर विधानसभेत

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडच्या वैशाली नगर विधानसभेत एक असा उमेदवार रिंगणात आहे, ज्याची ना राजकीय पार्श्वभूमी आहे ना कोणतीही मोठी ओळख. मात्र या उमेदवाराचं कामचं असं आहे की या मतदारसंघातील प्रत्येक लोक त्याला ओळखतात. कोण आहे हा उमेदवार आणि काय आहे त्याचं कार्य, जाणून घेण्यासाठी वाचा ही स्पेशल स्टोरी...

Chhattisgarh Election 2023
Chhattisgarh Election 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 4:16 PM IST

Updated : Oct 31, 2023, 8:01 PM IST

पाहा व्हिडिओ

भिलाई (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यापासून उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांसारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला असेल. मात्र या निवडणुकीत काही असेही उमेदवार आहेत, जे या नेत्यांइतके प्रसिद्ध नाहीत. मात्र ते जे काही कार्य करतात ते कोणालाही करणं शक्य नाही! वैशाली नगर विधानसभेत असाच एक उमेदवार उभा आहे. शंकर लाल साहू असं त्याचं नाव.

शंकर लाल साहू काय काम करतात : शंकर लाल साहू हे मागासवर्गीय समाजातून येतात. वैशाली शहरात क्वचितच कोणी असेल जो त्यांना ओळखत नाही. त्यांचं कामच असं आहे की ते पाहून कोणाचंही हृदय पिळवटून जातं. शंकर लाल साहू यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. तसंच त्यांचा कोणत्याही नेत्याशी संपर्क नाही. ते केवळ त्यांच्या कामाच्या माध्यमातून ओळखले जातात. शंकर लाल साहू गेल्या ३५ वर्षांपासून रामनगर मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्काराचं काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल १ लाख मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

बेवारस मृतदेहांवरही अंत्यसंस्कार : शंकर लाल साहू भिलाई रामनगर मुक्तिधाममध्ये कंत्राटी पद्धतीनं मृतदेह जाळण्याचं काम करतात. कोविडच्या काळात जेव्हा मुक्तिधाममध्ये लोक मृतदेह टाकून पळून जात असत, तेव्हा ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे. त्या काळात शंकर लाल यांनी अशा सुमारे ८० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शंकर लाल सांगतात की, त्यांच्या या कामातही भ्रष्टाचारानं पंख पसरले आहेत. शंकर लाल यांचा पगार केवळ १२ हजार रुपये आहे, मात्र त्यातही कंत्राटदार त्यांना कमिशन मागतो.

शंकर लाल यांचं ध्येय काय : शंकर लाल यांच्या म्हणण्यानुसार, वैशाली शहरात विकासाच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली आहे. वैशाली शहर अजूनही विकासासाठी तळमळतंय. शंकर लाल यांनी आतापर्यंत दोनवेळा आमदार, महापौर आणि नगरसेवकपदाची निवडणूक लढवली असून, यावेळी ते स्वाभिमान मंचच्या बॅनरखाली पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी विजयी झाल्यास वैशाली शहराचं चित्र बदलून टाकू, असं शंकर लाल सांगतात.

छत्तीसगडी चित्रपटांमध्येही काम केलंय : शंकर लाल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड. आत्तापर्यंत त्यांनी अनेक छत्तीसगडी चित्रपट आणि अल्बममध्ये काम केलं आहे. छत्तीसगडमध्ये प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं 'चार चिनाहरी नरवा गरवा घुमवा बारी' हे गाणं त्यांनीचं लिहिलंय. निवडणूक लढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसला तरी जनतेच्या पाठिंब्यावर ते या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत.

हेही वाचा :

  1. Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर

Last Updated : Oct 31, 2023, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.