Chhattisgarh Elections Result 2023 Live Updates : छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीकडं समस्त देशाचं लक्ष लागलंय. या राज्यात काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल की भाजपा पुन्हा एकदा बाजी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. छत्तीसगडमधील 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. 7 नोव्हेंबर रोजी येथे पहिल्या टप्यातील मतदान झालं. तर 17 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दरम्यान, यावर आज (3 डिसेंबर) मतमोजणी होणार असून जनतेनं कोणत्या उमेदवाराला कौल दिला? हे आता काही तासांत स्पष्ट होणार आहेत.
Updates :
- भरतपूर सोनहाट विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार गुलाब कामरो 1008 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस-11097, भाजपा-10089, गोंडवाना-7947
- पाटण जागेवर मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा पुतण्या यांच्यात जोरदार लढत सुरू आहे. मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर मुख्यमंत्री बघेल 164 मतांनी आघाडीवर आहेत.
- छत्तीसगडमध्ये भाजप 34 जागांवर आघाडी तर काँग्रेस पिछाडीवर : छत्तीसगडमधील 90 पैकी 64 जागांवर कल दिसून आला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला आघाडी मिळत आहे. भाजप 34 जागांनी पुढे असून काँग्रेस 28 जागांवर आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1 अन्य जागेवर आघाडीवर आहे.
- जशपूरमधील तीनही जागांवर भाजप आघाडीवर : पाचव्या फेरीनंतर जिल्ह्यातील तीनही विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे. जशपूरमधून रायमुनी भगत 10 हजार मतांनी पुढं आहेत. तर कुंकुरीमधून विष्णुदेव साई 11 हजार मतांनी पुढे आहेत. पाथळगावमधून गोमती साई 1400 मतांनी पुढे आहेत.
- पाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर आहेत.
- जंजगीर चंपा विधानसभेतून पहिल्या फेरीत काँग्रेसचे व्यास कश्यप 300 मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे उमेदवार नारायण चंदेल पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीनंतर कोरबा जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. कोरबा विधानसभेच्या हायप्रोफाईल जागेवर भाजप आघाडीवर आहे. खिलावन साहू (भाजप) 600 मतांनी पुढे आहेत. जैजैपूरमधून काँग्रेसचे उमेदवार बालेश्वर साहू 1600 मतांनी पुढे आहेत. चंद्रपूरमधून काँग्रेसचे उमेदवार रामकुमार यादव 950 मतांनी आघाडीवर आहेत.
- 90 जागांवर मतमोजणीची तयारी : 90 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 90 निवडणूक अधिकारी, 416 सहायक निवडणूक अधिकारी, 4596 मतमोजणी कर्मचारी आणि 1698 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या 90 जागांसाठी 90 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी तीन थरांत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये जिल्हा पोलीस दल, छत्तीसगड सशस्त्र दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाचा समावेश आहे.
हेही वाचा -