नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या पायाभरणीचे नेतृत्व केले. युद्धनीती, प्रशासकीय कौशल्ये, वीरता आणि इतर शौर्य कौशल्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. आजही एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे.
तुळजा भवानीचे भक्त : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील भोसले मराठा कुळात १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. ते शहाजी राजे भोसले आणि जिजाबाईंचे पुत्र होते. त्यांना शिवाई देवीच्या नावावरून शिवराय हे नाव देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी आई तुळजा भवानी होती. ते आई तुळजा भवानीचे भक्त होते.आई तुळजा भवानीने स्वत: प्रकट होऊन शिवरायांना तलवार दिली, असे म्हटले जाते.
मराठा स्वराज्याची स्थापना : छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मोगल साम्राज्याच्या विरोधात संघर्ष करून मराठा स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी कमी मनुष्यबळ व गनिमीकावा युद्धनीतीचा वापर करून शत्रूला पराभूत केले. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा औपचारिकपणे राज्याभिषेक झाला होता. भारतीय नौदलाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. शिवाजी महाराजांनी जयगड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग येथे काही प्रसिद्ध नाविक किल्लेही बांधले. त्यांच्या रणनीती आणि योगदानामुळे त्यांना 'भारतीय नौदलाचे जनक' म्हटले जाते.
अखेरचा श्वास घेतला : शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. मुस्लिम सरदार आणि सुबेदारांचाही शिवाजी महाराज यांच्या सैन्यात समावेश होता. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही कोणताही भेदभाव करता त्यांनी समानतेने सर्वांना सैन्यात नियुक्त केले. शिवाजी महाराजांनी स्त्रियांवरील हिंसाचार किंवा छळाचा नेहमी विरोध केला. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती संभाजी राजे यांनी शिवाजी महारांजाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा सांभाळ केला.
Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३४३ वी पुण्यतिथी, जाणून घेवू या इतिहास - शिवाजी महाराजांचे निधन
आज थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३४३ वी पुण्यतिथी आहे.
![Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३४३ वी पुण्यतिथी, जाणून घेवू या इतिहास Chhatrapati Shivaji Maharaj death anniversary](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/1200-675-18153588-thumbnail-16x9-chhatrapati-shivaji-maharaj.jpg?imwidth=3840)