पन्ना ( मध्यप्रदेश ) : आजच्या धावपळीच्या जीवनात तणावमुक्त राहायचे असेल तर निरोगी राहणे गरजेचे आहे. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. विवेक राज सिंग, छतरपूर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी प्रेरणा देत आहेत. डीआयजी विवेक राज सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत ( Chhatarpur DIG Viral Video ) आहे, ज्यामध्ये ते रस्त्यावर धावताना दिसत आहेत.
२१ किमी धावले : हा व्हिडिओ बुधवारी सकाळचा आहे. जेव्हा ते एका विभागीय बैठकीसाठी पन्ना येथे जात होते. यादरम्यान पन्ना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मडला केन नदीच्या पुलावर पोहोचताच ते गाडीतून खाली उतरले आणि पळू लागले. डीआयजी विवेक राज सिंह 21 किलोमीटर धावल्यानंतर पन्ना येथे पोहोचले. हे अंतरही त्यांनी अवघ्या अडीच तासांत कापले.
फिटनेसला देतात महत्त्व : डीआयजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर आरोग्याबाबत जागरुक असलेल्या अधिकाऱ्याचे लोकांकडून भरभरून कौतुक होत आहे. यासंदर्भात डीआयजी विवेक राज सिंह सांगतात की, ते त्यांच्या व्यस्त वेळेतही फिटनेसला विशेष महत्त्व देतात. कितीही व्यस्त असले तरी व्यायामासाठी वेळ काढा. असे केल्याने मेंदू देखील सतत सक्रिय राहतो. त्यांनी प्रत्येकाला रोज वर्कआउट करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : फिटनेस सेशनमध्ये थकलेली शिल्पा शेट्टी म्हणाली 'मार डाला'!!