नवी दिल्ली - कस्टम विभागाने चेन्नईच्या अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून साडेसात लाख रुपये किंमतीचे विदेशी चलन जप्त केले आहे. हा प्रवासी चेन्नईवरून दुबईला जात होता.
एक्स-रे मशीनमध्ये बॅग टाकल्यानंतर संशय -
या प्रवाशाने एक्स-रे मशीनमध्ये बॅग टाकल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगची चौकशी केली. त्यामधून 6600 यूरो और 2000 पाउंड जप्त करण्यात आले. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विदेशी चलनाची किंमत 7.78 लाख रुपये एवढी आहे.
चेन्नई कस्टम विभागाची कारवाई -
या प्रवाशाच्या बॅगमध्ये विदेशी चलन सापडल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे या बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी कस्टम अॅक्ट तसेच फेमा अॅक्ट अंतर्गत विदेशी चलन जप्त केले.