ETV Bharat / bharat

Cheetah Safari Kuno : आता कुनो नॅशनल पार्कमध्ये अनुभवा चित्ता सफारीचा आनंद! लवकरच मिळणार परवानगी - चित्ता सफारी

येत्या काही दिवसांत मुरैना आणि श्योपूरच्या कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये नामिबियन चित्ते पाहायला मिळतील. लवकरच या पार्कमध्ये चित्ता सफारीला परवानगी दिली जाणार आहे. चित्ता सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ऑनलाइन तिकीट बुकींग करू शकतात.

Cheetah
चित्ता
author img

By

Published : Feb 3, 2023, 10:41 AM IST

श्योपूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील वन्यजीव सफारीचे नाव ऐकल्यावर पन्ना व्याघ्र प्रकल्प, कान्हा राष्ट्रीय उद्यानातील वाघांची गर्जना इत्यादी चित्रे तुमच्या डोळ्यासमोर येतील, आता त्यात आणखी एक नाव जोडले जाणार आहे, ते म्हणजे कुनो नॅशनल पार्क! पर्यटक आता मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता सफारीचा आनंद घेऊ शकतात. गेल्या वर्षी नामिबियातून आणलेले चित्ते आता इथल्या वातावरणात मिसळले आहेत. आता सर्वसामान्यांना लवकरच हे चित्ते पाहायला मिळणार आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी महिन्यापासून चित्ता सफारीला परवानगी दिली जाणार आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये कसे पोहचाल : तुम्हाला कुनो नॅशनल पार्कमध्ये जायचे असेल तर आधी तुम्हाला मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात पोहोचावे लागेल. याशिवाय तुम्हाला कुनो नॅशनल पार्कला शिवपुरीतूनही जाता येते. श्योपूर ते कुनो नॅशनल पार्क हे अंतर 64 किमी आहे तर शिवपुरी जिल्ह्यापासूनचे अंतर सुमारे 75 किमी आहे. तिथे राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत. चित्ता सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सहजपणे ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पर्यटकांची सोय लक्षात घेऊन तिकीट बुक करण्यासोबतच पर्यटक जीवनावश्यक वस्तूही बुक करू शकतात, असे वन विभागाने म्हटले आहे.

दरवर्षी भारतात येणार चित्ते : नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले जातील. देशातील अनेक राष्ट्रीय उद्यानांमध्ये हे चित्ते पाठवले जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी फेब्रुवारीमध्ये बहुप्रतिक्षित चित्ता सफारीची पुष्टी केली असली तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. नवीन चित्ता सफारीमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि आदिवासी समाजासाठीही फायदा होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे.

कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान एका दृष्टीक्षेपात : कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान किंवा कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील श्योपूर आणि मोरेना जिल्ह्यांमध्ये पसरलेले राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य आहे. 1981 मध्ये हे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य म्हणून स्थापित करण्यात आले तर 2018 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या संरक्षित क्षेत्रामध्ये आणि आसपास राहणारे बहुतेक लोक सहारिया आदिवासी समुदायाचे आहेत.

हेही वाचा : Amul Price Hike : अमूलचे दूध पुन्हा महागले, जाणून घ्या नवे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.