नवी दिल्ली - सप्टेंबर महिना 4 दिवसांनी संपत ( Bank Holiday In October 2022 ) आहे. सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांचा विचार करण्यासाठी बँक हॉलीडेज कधीआहेत ते एकदा पाहून घ्या. ऑक्टोबरमध्ये नवरात्री, दसरा, दीपावली हे सण येत आहेत. ऑक्टोबरमध्ये बँकांमध्ये अनेक सुट्ट्या ( How many bank holidays October 2022 ) आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्या बँकांच्या संबंधी कोणतेही काम निघाल्यास आधी कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत ते जाणून घ्या.
सुट्टीचे कॅलेंडर जाहीर - ऑक्टोबर 2022 मध्ये बँकेला पुष्कळ सुट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे ऑक्टोबर सुट्टीचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. दुर्गा पूजा, दसरा , दीपावली, ईद अशा अनेक सणांचा त्यात उल्लेख आहे. गांधी जयंती या दिवशीही सुट्टी असते.
ऑनलाइन बँकिंग सेवा चालू - ऑनलाइन बँकिंग सेवा चालूआहे. या दरम्यान तुम्ही तुमची बँकिंग कामे ऑनलाइन रित्या चालू ठेवून शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा देशभरात सर्व दिवस उपलब्ध असेल.
ऑक्टोबरमध्ये बँक सुट्टीची पूर्ण यादी-
तारीख | सुट्टी | ठिकाण |
1 ऑक्टोबर | अर्धवार्षिक क्लोजिंग | सिक्किम |
2 ऑक्टोबर | गांधी जयंती, रविवार | सर्व ठिकणी |
3 ऑक्टोबर | दुर्गा पूजा (महा अष्टमी) | सिक्किम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, मेघालय, केरल, बिहार आणि मणिपुर |
4 ऑक्टोबर | दुर्गा पूजा/दसरा | कर्नाटक, ओडिशा, सिक्किम, केरल, बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मेघालय |
5 ऑक्टोबर | दुर्गा पूजा/दसरा (विजया दशमी) | मणिपूर सोडून पूर्ण भारतात |
6 ऑक्टोबर | दुर्गा पूजा | गंगटोक |
8 ऑक्टोबर | दूसरा शनिवार | सर्व ठिकणी |
9 ऑक्टोबर | रविवार | सर्व ठिकणी |
13 ऑक्टोबर | करवा चौथ | शिमला |
14 ऑक्टोबर | ईद-ए-मिलाद-उन-नबी | जम्मू आणि श्रीनगर |
16 ऑक्टोबर | रविवार | सर्व ठिकणी |
18 ऑक्टोबर | कटि बिहू | असाम |
22 ऑक्टोबर | चौथा शनिवार | सर्व ठिकणी |
23 ऑक्टोबर | रविवार | सर्व ठिकणी |
24 ऑक्टोबर | कालीपूजा/दीपावली/लक्ष्मीपूजन/ नरक चतुर्दशी | गंगटोक, हैदराबाद, इंफाल सोडून |
25 ऑक्टोबर | लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा | गंगटोक, हैदराबाद, इंफाल आणि जयपुर |
26 ऑक्टोबर | गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष | अहमदाबाद,बेलापुर, बेंगलूरु, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, शिमला, श्रीनगर |
27 ऑक्टोबर | भाऊबीज | गंगटोक, इंफाल, कानपुर आणि लखनऊ |
30 ऑक्टोबर | रविवार | सर्व ठिकणी |
31 ऑक्टोबर | सरदार वल्लभभाई पटेल जयंती | रांची, पटना आणि अहमदाबाद |