चमोली : चारधाम यात्रा 2023 चा सध्या भाविकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडण्यात आले आहेत. त्यानंतर आता चारधाम यात्रा 2023 साठी भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे आजपासून उघडणार आहेत. सकाळी 7.10 वाजता भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे विधीपूर्वक उघडण्याची प्रक्रिया पार पडत आहेत. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. यासोबतच बद्रीनाथ धाममध्ये इतरही व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मंदिर प्रशासन समिती दरवाजे उघडण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
पांडुकेश्वरवरुन बद्रीनाथ धामकडे निघाली डोली : पांडुकेश्वर येथील योग बद्री आणि कुबेर मंदिरात बुधवारी दरवाजे उघडण्याच्या संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी भजनाच्या गजरात डोलीला निरोप दिला. पांडुकेश्वरहून भगवान बद्री विशाल यांच्यासह भगवान कुबेर आणि बद्रीश पंचायतीमध्ये राहणारे भगवान उद्धवजी यांची डोली बद्रीनाथ धामकडे निघाली. पांडुकेश्वर योग बद्री येथून आदिगुरू शंकराचार्यांच्या गद्दी गडू घडा देखील बद्रीनाथ धामकडे रवाना झाला. भगवान कुबेर आणि भगवान उद्धव यांची डोली बुधवारी सायंकाळी उशिरा बद्रीनाथ धाम येथे पोहोचल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जोशीमठ येथे पार पडला गरुड छड मेळा : बद्रीनाथ मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर 24 एप्रिलला गरुडजींचे बद्रीनाथ धामकडे प्रस्थान करण्यात आले. गरुड छड मेळा असे संबोधत असून तो जोशीमठ येथील नरसिंह मंदिर मार्गावर आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी डिमरी पंचायत लक्ष्मीनारायण मंदिर डिमरहून गडू घडा तेलाचा कलश घेऊन नृसिंह मंदिर जोशीमठ येथे पोहोचले. 25 एप्रिलला आदिगुरू शंकराचार्यांच्या गादीसह, रावल आणि ईश्वरप्रसाद नंबूदिरीजी सोबत रात्रीच्या मुक्कामासाठी गडू घडा योग बद्री पांडुकेश्वरला पोहोचले. बुधवारी सायंकाळी आदिगुरु शंकराचार्य, रावल, गडू घडा, बद्री येथील पांडुकेश्वर योग उद्धव, कुबेर यांच्यासह बद्रीनाथ धाम येथे पोहोचले.
आजपासून बद्रीनाथ यात्रेला सुरुवात : मंदिराचे दरवाजे उघडताच आजपासून बद्रीनाथ यात्रेलाही सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने बद्रीनाथ मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमध्ये २२ एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू झाली आहे. 22 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे पोर्टल उघडण्यात आले. तर 25 एप्रिल रोजी बाबा केदारचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्याचवेळी आज बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याने चारधाम यात्रेला जोरदार सुरुवात झाली.
95 हजार भाविकांनी घेतले दर्शन : आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक भाविकांनी चारधामचे दर्शन घेतले आहे. सुरुवातीच्या प्रवासी हंगामातील प्रवाशांची संख्या पाहता यावेळी सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या कालावधीनंतर 2022 मध्ये चार धाम यात्रेत विक्रम मोडत यात्रेकरूंनी चारही धामांना भेट दिली होती. त्याचबरोबर या वेळी लाखो भाविकांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे चारधाममध्ये यात्रेकरूंच्या आगमनाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Shirdi Saibaba: शिर्डी साईबाबा मंदिराला CISF नको; एक मे पासून शिर्डी शहर बेमुदत बंदचा ग्रामस्थांचा इशारा