ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 update : चंद्रावर भूकंप! इस्रोनं नोंदवलं 'कंपनं', प्लाझमाचा अभ्यास सुरू

चंद्रावर ILSA उपकरणानं भूकंपनं नोंदवली आहेत. याबाबत इस्रोनं म्हटलं की, चंद्रयान-3 लँडरवरील भूकंपीय 'कंपन' रेकॉर्ड करण्यात यशस्वी झालं आहे.

Chandrayaan 3 update
Chandrayaan 3 update
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 11:05 PM IST

बेंगळुरू : चंद्रयान-3 प्रकल्पाच्या ताज्या अपडेटमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी सांगितलं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक लँडिंग झाल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी चंद्रावर भूकंपीय उपकरणानं म्हणजेच (ILSA) पेलोड, तीन दिवसांनी, एक 'घटना' नोंदवली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये, इस्रोनं सांगितलं की 'घटना' नैसर्गिक असल्याचं दिसतंय. याबाबत त्याची चौकशी केली जात आहे. स्पेस एजन्सीनं सांगितलं की ILSA पेलोडनं रोव्हर, इतर पेलोडच्या हालचाली देखील रेकॉर्ड केल्या आहेत.

  • Chandrayaan-3 Mission:
    In-situ Scientific Experiments

    Instrument for the Lunar Seismic Activity (ILSA) payload on Chandrayaan 3 Lander
    -- the first Micro Electro Mechanical Systems (MEMS) technology-based instrument on the moon --
    has recorded the movements of Rover and other… pic.twitter.com/Sjd5K14hPl

    — ISRO (@isro) August 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पेलोडच्या हालचाली रेकॉर्ड : इस्रोनं आपल्या ताज्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'चंद्रयान-3 लँडरवरील लूनर सिस्मिक ॲक्टिव्हिटी (ILSA) पेलोडच्या मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम (MEMS) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणानं रोव्हरसह इतर पेलोडच्या हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. याव्यतिरिक्त, 26 ऑगस्ट 2023 रोजी एक घटना देखील रेकॉर्ड केलीयं. जी नैसर्गिक असल्याचं दिसतं. या घटनेच्या स्रोताचा शोध घेण्यात येत आहे.

प्लाझ्मा वातावरणाचं मोजमाप : दुसर्‍या पोस्टमध्ये, स्पेस एजन्सीनं सांगितलं की चंद्राच्या रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर आणि ॲटमॉस्फियर - लॅंगमुइर प्रोब (रंभा-एलपी) पेलोड चंद्रयान-3 लँडरनं दक्षिण ध्रुवावर जवळच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरणाचं पहिलं मोजमाप केलंय. 'प्रारंभिक मूल्यांकनावरून असं दिसून आलं, की चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा तुलनेनं विरळ आहे. याव्यतिरिक्त, आगामी चंद्रावर लँडिंगसाठी प्रगत डिझाइनमध्ये याचा वापर करता येऊ शकतो.

ILSA म्हणजे काय? : चांद्रयान 3 लँडरवरील लुनार सिस्मिक ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रुमेंट (ILSA) पेलोड हे चंद्रावरील मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम (MEMS) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाचं पहिले उदाहरण आहे. यात रोव्हर आणि इतर पेलोडच्या हालचालींमुळं होणारी कंपनं नोंदवली गेली आहेत. ILSA मध्ये सहा उच्च-संवेदनशीलता प्रवेगकांच्या ॲरेचा समावेश आहे, जे सिलिकॉन मायक्रोमॅशिनिंग प्रक्रियेचा वापर करून तयार केलं आहे. कोर सेन्सिंग एलिमेंटमध्ये कॉम्ब स्ट्रक्चर्ड इलेक्ट्रोडसह स्प्रिंग-मास सिस्टम असतं. बाह्य कंपनामुळं स्प्रिंगचं विक्षेपण होतं, परिणामी कॅपेसिटन्समध्ये बदल होऊन नंतर व्होल्टेजमध्ये रूपांतरित होतो.

कंपन केली रेकॉर्ड : ILSA चा प्राथमिक उद्देश नैसर्गिक भूकंप, प्रभाव, कृत्रिम घटनांमुळं होणारी भूकंपाचं मोजमाप करणे आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी रोव्हरच्या नेव्हिगेशन दरम्यान रेकॉर्ड केलेली कंपने आकृतीमध्ये दर्शविली आहेत. याव्यतिरिक्त, 26 ऑगस्ट 2023 रोजी नोंदलेली घटना, जी नैसर्गिक असल्याचं दिसतं, ते देखील दाखवले आहे. या घटनेसंदर्भात सध्या अभ्यास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार झाल्यानं पूरस्थिती गंभीर; मृतांचा वाढला आकडा
  2. ISRO : चंद्रयानानंतर आम्ही मंगळ किंवा शुक्रावर मोहिमा करण्यास सक्षम - इस्रो प्रमुख एस सोमनाथ
  3. Chandrayaan ३ : 'चंद्रयान'वरून ठेवली बाळांची नावं; एक 'विक्रम' तर दुसरा 'प्रज्ञान'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.