ETV Bharat / bharat

Chandrayaan ३ Rover : 'प्रज्ञान' रोव्हरचं चंद्रावरील कार्य पूर्ण, रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट - इस्रो

Chandrayaan ३ Rover : 'प्रज्ञान' रोव्हरच्या चंद्रावरील असाइनमेंट पूर्ण झाल्या असून, त्याला आता स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आलंय. चंद्रावर पुढील सूर्योदय झाल्यानंतर रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट होण्याची अपेक्षा इस्रोला आहे.त्यामुळं पुढील सूर्योदय होईपर्यंत आता वाट पाहावी लागणार आहे.

Chandrayaan 3 Rover
Chandrayaan 3 Rover
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 8:47 AM IST

नवी दिल्ली : Chandrayaan ३ Rover : चंद्राच्या पृष्ठभागावरील 'शिवशक्ती' पॉइंटवरून (विक्रम लँडरचा टचडाउन स्पॉट) १०० मीटरपेक्षा जास्त भ्रमण केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरचं सुरक्षित पार्किंग करण्यात आलंय. सध्या रोव्हर स्लीप मोडमध्ये आहे. इस्रोनं 'X' वर पोस्ट करत ही माहिती दिली.

  • Chandrayaan-3 Mission:
    The Rover completed its assignments.

    It is now safely parked and set into Sleep mode.
    APXS and LIBS payloads are turned off.
    Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.

    Currently, the battery is fully charged.
    The solar panel is…

    — ISRO (@isro) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रोव्हरनं सुरक्षित पार्किंग केलं : 'रोव्हरनं त्याच्या सर्व असाइनमेंट पूर्ण केल्या. त्याला आता सुरक्षितपणे पार्क करण्यात आलंय. तो सध्या स्लीप मोडमध्ये सेट आहे. APXS आणि LIBS पेलोड्स बंद आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जातो. सध्या, बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे', अशी माहिती इस्रोनं दिली. 'चंद्रावर २२ सप्टेंबर २०२३ रोजी पुढील सूर्योदय होईल. तेव्हा रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्हेट होण्याची अपेक्षा आहे', असंही इस्रोनं सांगितलं.

मॉड्यूलनं चंद्रावर एक नैसर्गिक घटना नोंदवली : गुरुवारी इस्रोने सांगितलं की, विक्रम लँडरच्या प्रज्ञान रोव्हर मॉड्यूलनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक नैसर्गिक घटना नोंदवली. 'मॉड्यूलनं रोव्हर आणि इतर पेलोड्सच्या हालचालींची नोंद केली. ही घटना २६ ऑगस्ट २०२३ रोजी घडली. ही घटना नैसर्गिक असण्याची शक्यता आहे. याचा स्रोत तपासला जात आहे'.

चंद्रयान ३ मिशनमध्ये तीन घटक आहेत : चंद्रयान ३ चं रोव्हर २५ ऑगस्ट रोजी विक्रम लँडरमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. चंद्रयान ३ मिशनमध्ये तीन घटक आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल, ज्यानं लँडर आणि रोव्हर मॉड्यूल १०० किलोमीटरच्या चंद्राच्या कक्षेत हस्तांतरित केलं. लँडर मॉड्यूल, जे चंद्र यानाच्या सॉफ्ट लँडिंगसाठी जबाबदार होतं आणि रोव्हर मॉड्यूल, ज्याच्याकडे चंद्रावरील घटकांचा शोध घेण्याचं काम आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी : चंद्रयान ३ लँडर मॉड्यूल २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरलं. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनलाय. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया या देशांचं लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे, मात्र कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिग करण्यात यशस्वी झाला नव्हता.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 update : चंद्रावर भूकंप! इस्रोनं नोंदवलं 'कंपनं', प्लाझमाचा अभ्यास सुरू
  2. Aditya L१ Launch : अखेर अवकाशात झेपावलं 'आदित्य एल १'; 'या' ठिकाणावरुन करणार सूर्याचा अभ्यास
  3. Aditya L१ : 'आदित्य एल १' चं स्टेअरिंग महिला शास्त्रज्ञाच्या हाती; 'ईटीव्ही भारत'सोबत खास संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.