ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 Mission Spacecraft : चांद्रयान-३ अवकाशात झेपावले; भारतासाठी ऐतिहासिक क्षण

चांद्रयान-३ अवकाशात झेपावले आहे. देशातील तिसरी चंद्र मोहीम 'चांद्रयान-3' च्या प्रक्षेपणासाठी 25.30 तासांचे काउन्टडाऊन गुरुवारी अंतराळ केंद्रात सुरू झाले होते. आज दुपारी चांद्रयान 3 ने अडीच वाजता अवकाशात उड्डाण घेतले आहे.

Chandrayaan 3 launch Update
चांद्रयान ३ मोहिम
author img

By

Published : Jul 14, 2023, 10:41 AM IST

Updated : Jul 14, 2023, 2:49 PM IST

श्रीहरिकोटा : 'चांद्रयान-3' शुक्रवारी दुपारी अवकाशाकडे झेपावले आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अवकाश शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. यापूर्वी 'चांद्रयान-2' मोहिमेदरम्यान शेवटच्या क्षणी, लँडर 'विक्रम' मार्गाच्या विचलनामुळे 'सॉफ्ट लँडिंग' करू शकले नाही. आजचे मिशन यशस्वी झाले तर भारत अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियनसारख्या देशांच्या क्लबमध्ये सामील होणारा चौथा देश ठरणार आहे.

  • #WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches #Chandrayaan-3 Moon mission from Satish Dhawan Space Centre in Sriharikota.

    Chandrayaan-3 is equipped with a lander, a rover and a propulsion module. pic.twitter.com/KwqzTLglnK

    — ANI (@ANI) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रत्येक मिशन देशासाठी मैलाचा दगड - गोदरेज एरोस्पेसचे असिस्टंट व्हीपी आणि बिझनेस हेड मनेक बेहरामकामदीन म्हणाले की, चंद्र मोहिमेतील ८०-९० टक्के भाग हे 'स्वदेशी' आहेत. हे प्रक्षेपण इस्रोच्या 'संस्थापक आणि मेहनती शास्त्रज्ञांना' श्रद्धांजली आहे. प्रत्येक मिशन देशासाठी मैलाचा दगड असून ही तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक मोहीम आहे. पण हा चांगला क्षण असणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'चांद्रयान-3' साठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अभिनंदन केले आहे. विज्ञान, नवकल्पना आणि मानवी जिज्ञासा यातील प्रगती साजरी करूया, हे मिशन सर्वांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

सतीश धवन स्पेस सेंटरचे माजी संचालक पांडियन म्हणाले, की एस. चांद्रयान 3 चा लँडर चांद्रयान 2 पेक्षा अधिक मजबूत आहे. यावेळी आम्ही एका सेन्सरऐवजी दोन सेन्सर बसवले आहेत. जर एका सेन्सरचे काम थांबले , तर आम्ही दुसरा सेन्सर वापरू शकणार आहोत. आम्ही अनेक साधने आणि सॉफ्टवेअर आणले आहेत. त्यामुळे कामात अधिक लवचिकता असणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करत चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत.

इस्रोने सोशल मीडियामधील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'दुपारी 2.35 वाजता LVM3M4-चांद्रयान-3 मिशनच्या प्रक्षेपणासाठी काउन्टडाऊन सुरू झाले आहे. चांद्रयान-3' कार्यक्रमांतर्गत, इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट-लँडिंग' आणि चंद्राच्या भूभागावर रोव्हर रोटेशनचे प्रात्यक्षिक करून भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी दाखविणार आहे. LVM3M4 रॉकेट इस्रोच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-3' ला चंद्रावर घेऊन जाणार आहे. जड उपकरणे वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे अवकाश शास्त्रज्ञ त्याला 'फॅट बॉय' असे म्हणतात.

  • अशी आहे 'सॉफ्ट लँडिंग' योजना: इस्रोने ऑगस्टच्या अखेरीस तिसरी चांद्रयान मोहिम आखली आहे. ही मोहीम भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल, असा वैज्ञानिकांना विश्वास आहे. चांद्रयान-3 मोहिमेमध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हर या तीन घटकांचा समावेश आहे.
  • श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपण सराव: तिसऱ्या चंद्र मोहिमेद्वारे, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या कक्षेत यान पोहोचविणे, लँडरचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट-लँडिंग' करणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे स्कॅनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अभ्यास करण्यासाठी रोव्हर लँडरमधून सोडले जाणार आहे. त्यानंतरत ते चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. मंगळवारी, श्रीहरीकोटा येथे प्रक्षेपणाची संपूर्ण तयारी आणि प्रक्रिया पाहण्यासाठी २४ तास 'लाँच ड्रिल' झाली आहे.

चांद्र मोहिमेचा विकास कसा झाला? 15 ऑगस्ट 2003 रोजी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी चांद्रयान कार्यक्रमाची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2008 रोजी इस्रोने PSLV-C11 रॉकेटने पहिले मिशन 'चांद्रयान-1' पूर्ण केले. लॉन्चच्या वेळी 320 टन वजन असलेल्या या यानात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियामध्ये बनवलेली 11 वैज्ञानिक उपकरणे होती. तामिळनाडूचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ मायिलसामी अन्नादुराई यांनी 'चांद्रयान-1' मोहिमेचे संचालक म्हणून भूमिका बजाविली होती.

चांद्रयान 2 मोहिम ठरली होती अयशस्वी- चांद्रयान -2 मोहिमेत यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती फिरले होते. चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंग करून मोहिमेने सर्व इच्छित उद्दिष्टे साध्य केली. तेव्हा प्रक्षेपणानंतर काही महिन्यांनी मे 2009 मध्ये यानाची कक्षा 200 किमी पर्यंत वाढवण्यात आली. उपग्रहाने चंद्राभोवती 3,400 हून अधिक प्रदक्षिणा केल्यानंतर मिशन अखेरीस संपले. 29 ऑगस्ट 2009 रोजी या यानाचा अंतराळ यानाशी संपर्क तुटला होता.

पंतप्रधानांनी इस्रोच्या प्रमुखांचे केले होते सांत्वन-इस्रोने 'चांद्रयान-2' या मोहिमेत चंद्राच्या 100 किमी उंचीवर प्रदक्षिणा घातल्यानंतर, चंद्राच्या पृष्ठभागाकडे 'लँडर'चे उतरणे नियोजित प्रमाणे होते. मात्र, शास्त्रज्ञांचा 'विक्रम'शी संपर्क तुटल्याने ही मोहिम बंद पडली . 'चांद्रयान-2' मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात अयशस्वी ठरल्याने इस्रो टीमची निराशा झाली. त्यावेळी वैज्ञानिक कामगिरी पाहण्यासाठी इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. शिवन यांचे सांत्वन केले होते.

हेही वाचा-

  1. Chandrayaan 3 : भारत आज इतिहास घडवणार; जाणून घ्या चांद्रयान 2 पेक्षा चांद्रयान 3 मोहीम कशी आहे वेगळी, काय करण्यात आले अपग्रेड

Last Updated : Jul 14, 2023, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.