ETV Bharat / bharat

'केसीआर' मोदींच्या तालावर नाचतात; तेलंगाणा काँग्रेसची टीका

author img

By

Published : Nov 20, 2020, 10:26 AM IST

केसीआर हे खोटं बोलण्यात तरबेज आहेत. आताही भाजपविरोधात त्यांनी उघडलेली मोहीम, ही इतरांच्या डोळ्यात धूळ फेकून भाजपची मदत करण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे. केसीआर हे भाजप आणि मोदींच्या तालावर नाचतात, आणि संपूर्ण देशाला त्यांच्या नाटकीपणाबद्दल माहिती आहे. अशा शब्दांमध्ये रेड्डींनी केसीआर यांच्यावर निशाणा साधला.

Chandrashekar Rao dances to PM Modi's tune, says Telangana Congress
'केसीआर' मोदींच्या तालावर नाचतात; तेलंगणा काँग्रेसची टीका

हैदराबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे पंतप्रधान मोदींच्या तालावर नाचतात, असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपविरोधी मोहीम सुरू करण्याची घोषणा केसीआर यांनी केली होती. त्यानंतर, काँग्रेस खासदार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केसीआर खोटारडे; मोदींच्या तालावर नाचतात..

केसीआर हे खोटं बोलण्यात तरबेज आहेत. आताही भाजपविरोधात त्यांनी उघडलेली मोहीम, ही इतरांच्या डोळ्यात धूळ फेकून भाजपची मदत करण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे. केसीआर हे भाजप आणि मोदींच्या तालावर नाचतात, आणि संपूर्ण देशाला त्यांच्या नाटकीपणाबद्दल माहिती आहे. अशा शब्दांमध्ये रेड्डींनी केसीआर यांच्यावर निशाणा साधला.

केसीआर यांची भाजपविरोधी मोहीम..

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी मोहीम सुरू करण्याची घोषणा बुधवारी केली. यासाठी त्यांनी एनडीएमध्ये नसलेल्या सर्व पक्षांची डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक बोलावली आहे. इतर प्रादेशिक पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करताना केसीआर यांनी काँग्रेसला मात्र या बैठकीपासून दुर ठेवले आहे. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांनी आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे भाजप बरोबर काँग्रेसपासूनही केसीआर यांनी दोन हात लांब रहाणे पसंत केले आहे.

भाजप नव्हे, तर काँग्रेसविरोधी मोहीम..

राव यांनी भाजपविरोधी नाव दिले असले, तरी ही मोहीम खरेतर काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी आखण्यात आली आहे. केसीआर यांनी २०१८ मध्येही भाजपविरोधी घोषणाबाजी केली होती, मात्र पुढे काहीच झाले नाही. सध्या एनडीए कमजोर होत चालली आहे, त्यामुळे तिला मजबूत करण्यासाठीचा हा डाव असल्याचेही रेड्डी यावेळी म्हणाले.

केसीआर यांनी शेतकरी कायदे रद्द करुन दाखवावे..

जर केसीआर यांना खरोखरच भाजपविरोधी मोहीम उघडायची आहे, तर त्यांनी अगोदर आपल्या राज्यात केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करुन दाखवावी. जर त्यांनी तसे केले, तर आम्ही कदाचित त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेऊ, असे रेड्डी म्हणाले. आम्ही त्यांना २० वर्षांपासून पाहतो आहोत, आणि हजारो वेळा त्यांना खोटं बोलताना पकडलं आहे, असे रेड्डींनी म्हटले.

हेही वाचा : भाजप विरोधात 'केसीआर' मैदानात; काँग्रेसला दूर ठेवत इतर प्रादेशिक पक्षांना आणणार एका छत्राखाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.