ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यभरात मतदार मतदान केंद्रावर जात मतदान करत आहेत. दरम्यान, ठाण्यातील मनोरमा नगर येथील भाजपा कार्यालयात 'डेमो ईव्हीएम मशीन' बनवून त्याच्या मदतीनं मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांनी केला आरोप : "या डेमो मशीनवर संजय केळकर यांचा फोटो, त्यांच्या पक्षाचं चिन्ह आणि कोणत्या क्रमांकासमोरील बटण दाबावं हे नमूद केलं आहे. अशा प्रकारे तीन बुथवर या डेमो मशीन ठेवण्यात आल्या होत्या. ऐन मतदानाच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यांकडून संजय केळकर यांना मतदान करा, असं आवाहन करत डेमो ईव्हीएम मशीनचा वापर करून आचारसंहितेचा भंग केला," असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
डेमो ईव्हीएम घेतलं ताब्यात : "ठाणे पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर डमी ईव्हीएम ताब्यात घेतलं असून, निवडणूक आयोगाच्या मदतीनं चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल," असं कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोळ यांनी सांगितलं.
हेही वाचा