हैदराबाद : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा करण्यात येते. हा दिवस माता ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेला समर्पित करण्यात येतो. माता ब्रह्मचारिणी देवीच्या विशेष उपासनेद्वारे भक्तांना माता ब्रह्मचारिणीकडून इच्छित आशीर्वाद मिळतात अशी भक्तांची धारणा आहे. माता ब्रह्मचारिणी अनवाणी चालत असून कोणतेही वाहन वापरत नसल्याची भक्तांची धारणा आहे. माता त्यागाचे प्रतीक मानली जाऊन ती भक्तांना साधे जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असल्याचीही भक्तांची श्रद्धा आहे.
कोण आहे माता ब्रह्मचारिणी : माता ब्रह्मचारिणी भक्तांना तपश्चर्या, प्रेम, शांती आणि स्नेह प्रदान करण्यासाठी ओळखली जाते. शास्त्रानुसार माता ब्रह्मचारिणी देवी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. त्यामुळे मातेचे रूप अतिशय सुंदर आहे. ती पांढरी वस्त्रे परिधान करत असून मातेच्या हातात 'कमंडल' आणि 'जप माला' असते. माता ब्रह्मचारिणीचे मुख सूर्यासारखे तेजस्वी असून चंद्राप्रमाणे शांतता व शीतलता देत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.
काय आहेत ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेचे फायदे : माता ब्रह्मचारिणीच्या उपासनेने शक्ती, सदाचार, आत्मसंयम, दृढनिश्चय, त्याग आणि संयम वाढतो अशी भक्तांची भावना आहे. त्यामुळे बाविक मोठ्या श्रद्धेने माता ब्रह्मचारिणीची पूजा करतात. माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने भक्त त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि आव्हानांना तोंड देण्यास सक्षम होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने मनुष्य आपल्या लोभ, क्रोध, वासना, अहंकार आदींवर विजय मिळवण्यास सक्षम होतो. मातेच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याचीही भक्तांची धारणा आहे.
कशी करावी मातेची पूजा : ब्रह्मचारिणी मातेची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजास्थानाची स्वच्छता करावी. त्यासमोर माता ब्रह्मचारिणीचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी आणि पूजेसाठी जागा सजवण्यात यावी. त्यानंतर माता ब्रह्मचारिणीची मूर्ती किंवा चित्रासमोर ध्यान करावे. मातेची पूजा करून त्यांना पिवळे वस्त्र, चमेलीची फुले, फळे, नैवेद्य-मिठाई आदी अर्पण करुन मातेची प्रार्थना करावी.
कोणते आहेत मातेच्या पूजेचे मंत्र :
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेणा संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
पूजेच्या दिवशी माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी मातेच्या ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करण्यात यावा. संध्याकाळी पुन्हा तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून भोग अर्पण करून आरती करावी. माता ब्रह्मचारिणीची उपासना करणाऱ्या साधकांनी ब्रह्मचर्य व्रत पाळावे.
हेही वाचा - Papmochani Ekadashi 2023: पापमोचनी एकादशीच्या दिवशी करावी भगवान विष्णूंची पूजा, टाळाव्या 'या' गोष्टी