नवी दिल्ली - कोरोनाला बळी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई रक्कम देता येणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे नातेवाईकांना भरपाईची रक्कम दिली जाऊ शकत नाही. कारण, यामुळे आपत्ती निवारण निधीच रिक्त होईल. सर्व कोरोना पीडितांना नुकसान भरपाई देणे राज्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे आहे, असे केंद्राने म्हटलं.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नुकसान भरपाईची तरतूद केवळ भूकंप, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींना लागू आहे, जी कोरोना साथीवर लागू होऊ शकत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटूंबाला 4 लाख रुपयांची रक्कम दिली गेली. एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल. आणि एकूण खर्चही वाढू शकतो, असं केंद्रानं न्यायालयाला सांगितलं.
ऑक्टोबरनंतर देशात कोरोनाची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, यूपीत करोना मृत्युंची संख्या अधिक आहे. देशात कोरोना संसर्गाने भयावह रुप घेतले आहे. मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 58,419 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 1576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 87,619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोना रुग्ण : 2,98,81,965
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,87,66,009
- एकूण सक्रिय रुग्ण : 7,29,243
- एकूण मृत्यू : 3,86,713
- आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 27,66,93,572