ETV Bharat / bharat

Centre Blocks 14 Terror Apps : पाकिस्तानातील दहशतवाद्यांना पुरवत होते माहिती, केंद्राकडून 14 मॅसेंजर अ‍ॅपवर घातली बंदी - पाकिस्तानी ग्रूपला माहिती

सरकारने 14 मोबाईल मॅसेंजर अ‍ॅपवर बंदी घातली आहे. हे मोबाईल अ‍ॅप पाकिस्तानी ग्रूपला माहिती पुरवत असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणेसह गुप्तचर यंत्रणेने केला होता.

Centre Blocks 14 Terror Apps
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2023, 1:43 PM IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी 14 मोबाइल मेसेंजर अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. या मॅसेंजरचा वापर दहशतवादी पाकिस्तानमधून संदेश पुरवण्यासाठी करत होते. संरक्षण दल, सुरक्षा दल, गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या शिफारशीवरून या मॅसेंजर अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या अ‍ॅपबाबत सुरक्षा दल आणि गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपवर आता कोणतेही मॅसेज भारतातून पाठवण्यात येता येणार नाही.

या अ‍ॅपवर घालण्यात आली बंदी : या अ‍ॅप्समध्ये क्रीपवायझर Crypviser, इनिग्मा Enigma, सेफवाईज Safeswiss, विक्रीम Wickrme, मीडिया फायर Mediafire, ब्रायर Briar, बी चॅट BChat, नंदबॉक्स Nandbox, कॉलीयन Conion, आयएमओ IMO, एलिमेंट Element, सेकंड लाईन Second line, झांगी Zangi, Threema यांचा समावेश आहे. सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69A अंतर्गत या मॅसेंजर अ‍ॅपला ब्लॉक केले आहे.

भारतात आढळले नाही कार्यालय : सुरक्षा एजन्सींनी यापूर्वी हे अ‍ॅप्स पाकिस्तानस्थित दहशतवादी ऑपरेट करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दहशतवादी हे अ‍ॅप त्यांचे समर्थक आणि काश्मीरमधील ऑन ग्राउंड कामगार (OGW) यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे भारतीय सुरक्षा दल आणि तपास यंत्रणांनी अ‍ॅप डेव्हलपरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु या अ‍ॅपचे भारतात कोणतेही कार्यालय सापडले नाही. या अ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांना निनावी असल्याचा पत्ता दिला. त्यामुळे सुरक्षा एजन्सींना या वापरकर्त्यांचा शोध घेणे कठीण झाले होते.

दहतवाद्यांचा शोध घेणे सुरूच : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. 20 एप्रिलमध्ये जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान ट्रकमधून सैनिक प्रवास करत असताना अतिरेक्यांनी वाहनावर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केल्याने अज्ञात दहशतवाद्यांचा शोध घेणे बाकी आहे. दहतवाद्यांचा शोध घेताना याबाबतची माहिती मिळाल्याने अशा अ‍ॅपवर बंदी घालणे गरजे आहे.

या अगोदर चीनी अ‍ॅपवर बंदी : गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 200 हून अधिक चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप PUBG आणि लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकचा समावेश आहे. हे अ‍ॅप्स भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना अडचणीचे ठरेल अशा कार्यांमध्ये गुंतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती.

भारतीयांच्या हिताचे रक्षण : सरकारने 14 मॅसेंजर अ‍ॅपवर बंदी घातल्याने नागरिकांची माहिती लिक होणार नाही. हे पाऊल करोडो भारतीय मोबाइल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यामुळे या मॅसेंजर अ‍ॅपवर घालण्यात आलेल्या बंदीचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

हेही वाचा - VRS To Fat And Alcoholic Policemen : लठ्ठ, मद्यपी पोलिसांची आता खैर नाही, आसामचे मुख्यमंत्री सुरू करणार स्वेच्छा निवृत्ती योजना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.