ETV Bharat / bharat

Transponders For Fishermen : मच्छिमारांना मिळतील इस्रोने तयार केलेले ट्रान्सपॉन्डर मोफत, चक्रीवादळाचा इशारा मिळणार - इस्रो

किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकार मच्छिमारांना 3.5 लाख ट्रान्सपॉन्डर मोफत देणार आहे. ट्रान्सपॉन्डर मिळाल्यानंतर मच्छिमारांना चक्रीवादळ आणि हवामानाशी संबंधित माहितीही मिळू शकते. याशिवाय मच्छिमारांनाही संकटाच्या वेळी संपर्क देखील साधता येऊ शकतो. या ट्रान्सपॉंडर्सची निर्मिती इस्रोकडून केली जाणार आहे.

Transponders For Fishermen
मच्छिमारांना ट्रान्सपॉन्डर
author img

By

Published : May 27, 2023, 10:32 PM IST

नवी दिल्ली : किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकार मच्छिमारांना 3.5 लाख मोफत ट्रान्सपॉन्डर पुरवणार आहे. हे त्यांना ट्रॅक करण्यास मदत करेल तसेच त्यांच्या व्यवसायाला देखील चालना देईल. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, टप्प्याटप्प्याने 3.5 लाख मच्छिमारांना ट्रान्सपॉन्डर दिले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 20 मीटरपेक्षा कमी आकाराच्या बोटींवर एक लाख ट्रान्सपॉंडर्स बसवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.

मच्छिमारांना हवामानाचा इशारा पाठवला जाऊ शकतो : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे हे ट्रान्सपॉन्डर तयार केले जात आहेत. हे ट्रान्सपॉन्डर प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांशी संबंधित असतील. किनारपट्टी भागात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसह राज्ये आणि केंद्राच्या मत्स्यव्यवसाय विभाग व सरकारी संस्था समन्वय साधत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रान्सपॉन्डरद्वारे चक्रीवादळ किंवा इतर हवामानाचा इशारा मच्छिमारांना पाठवला जाऊ शकतो. त्याचबरोबर मच्छीमारांना संकट आल्यास या माध्यमातून संपर्क साधून मदत मिळू शकेल. तमिळनाडूमध्ये हे ट्रान्सपॉन्डर्स सब - 20 मीटर बोटींवर बसवण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे.

डोवाल यांनी सागरी सुरक्षा गटाच्या बैठकीला संबोधित केले : राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) जी अशोक कुमार यांचे कार्यालय मच्छिमारांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय संस्थांसोबत काम करत आहे. त्याच वेळी, एजन्सी आधार कार्डप्रमाणेच त्यांच्या ओळखपत्राची छायाप्रत वापरण्यास परवानगी देतील, ज्यामुळे मूळ दस्तऐवजाच्या अडचणी टाळता येतील. इतकेच नाही तर सागरी सुरक्षेवर विशेष भर देऊन सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, भारत सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अंतर्गत प्रथम राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक नियुक्त केले आहेत. या क्रमाने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बहु - एजन्सी सागरी सुरक्षा गटाच्या बैठकीला संबोधित केले, ज्यात सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांचा समावेश आहे.

मासेमारी जहाजांमध्ये स्वयंचलित ओळख प्रणाली अनिवार्य : उल्लेखनीय म्हणजे, 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर मासेमारी जहाजांमध्ये स्वयंचलित ओळख प्रणाली स्थापित करणे अनिवार्य करण्यात आले होते. कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय जलक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी चोरीची बोट वापरण्याचा प्रयत्न केला होता. यासह मुंबईत अनेक लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. ISRO News : इस्रोने केले आरएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण, हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किमी उंचीवर उड्डाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.