नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने तांदूळ, तूर, मूग आणि उडीद डाळीच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे.
-
#WATCH मूंग दाल के न्यूनतम समर्थन मूल्य पर सबसे अधिक 10.4%, मूंगफली पर 9%, सेसमम पर 10.3%, धान पर 7%, जवार, बाजरा, रागी, मेज, अरहर दाल, उड़द दाल, सोयाबीन, सूरजमुखी बीज पर वित्त वर्ष 2023-2024 के लिए लगभग 6-7% की वृद्धि की गई है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, दिल्ली pic.twitter.com/Img1FSlDbU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH मूंग दाल के न्यूनतम समर्थन मूल्य पर सबसे अधिक 10.4%, मूंगफली पर 9%, सेसमम पर 10.3%, धान पर 7%, जवार, बाजरा, रागी, मेज, अरहर दाल, उड़द दाल, सोयाबीन, सूरजमुखी बीज पर वित्त वर्ष 2023-2024 के लिए लगभग 6-7% की वृद्धि की गई है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, दिल्ली pic.twitter.com/Img1FSlDbU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2023#WATCH मूंग दाल के न्यूनतम समर्थन मूल्य पर सबसे अधिक 10.4%, मूंगफली पर 9%, सेसमम पर 10.3%, धान पर 7%, जवार, बाजरा, रागी, मेज, अरहर दाल, उड़द दाल, सोयाबीन, सूरजमुखी बीज पर वित्त वर्ष 2023-2024 के लिए लगभग 6-7% की वृद्धि की गई है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, दिल्ली pic.twitter.com/Img1FSlDbU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2023
सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ : सरकारने 2023-24 वर्षासाठी तांदळाची किमान आधारभूत किंमत 143 रुपयांनी वाढवून 2,183 रुपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना भातशेती करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत 2023 - 24 वर्षासाठी सर्व खरीप (उन्हाळी) पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
'शेतकऱ्यांना फायदा होईल' : अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी CCEA बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, 'कृषी क्षेत्रात, आम्ही कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP) शिफारशींच्या आधारे वेळेनुसार एमएसपी निश्चित करतो. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा एमएसपीमध्ये अधिक वाढ करण्यात आली आहे. ते म्हणाले की, ज्या वेळी किरकोळ महागाई कमी होत आहे, तेव्हा एमएसपी वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल.
मूगाच्या एमएसपीत 10.4 टक्के वाढ : गोयल यांनी माहिती दिली की, सामान्य ग्रेड तांदळाचा एमएसपी 143 रुपयांनी वाढवून 2,040 रुपयांवरून 2,183 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. 'अ' ग्रेड तांदळाचा एमएसपी 143 रुपयांनी वाढवून 2,203 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मूगमध्ये किमान आधारभूत किमतीत कमाल 10.4 टक्के वाढ करण्यात आली आहे. मूगचा एमएसपी आता 8,558 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. गेल्या वर्षी तो 7,755 रुपये प्रतिक्विंटल होता. देशात भात हे प्रमुख खरीप पीक आहे आणि त्याची पेरणी सामान्यत: नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभापासून सुरू होते. भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे की एल निनोचा प्रभाव असला तरी, यावर्षी जून - सप्टेंबरमध्ये मान्सून सामान्य राहील.
हेही वाचा :
- Today Cryptocurrency Price: मार्केटमध्ये आज काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या पेट्रोल डिझेल, क्रिप्टोकरन्सी, भाजीपाला आणि सोने चांदीचे दर
- World Food safety Day 2023 : 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' जगभरात साजरा केला जातो; त्याचा इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या...
- Monsoon Update : पुढील 24 तासात उत्तरेकडे सरकणार बिपोरजॉय चक्रीवादळ; या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता