ETV Bharat / bharat

Global Hunger Index 2022: चुकीच्या ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे भारतावर कलंक- केंद्र सरकारचा दावा - ग्लोबल हंगर इंडेक्स

काल प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स (global hunger index) रिपोर्टला केंद्र सरकारने नाकारले आहे. (central government reject GHI). एका निवेदनात केंद्र सरकारने म्हटले आहे की, हा निर्देशांक गंभीर समस्यांनी ग्रस्त आहे. यातील भुकेचे मापदंड चुकीचे आहेत.

Global Hunger Index 2022
Global Hunger Index 2022
author img

By

Published : Oct 16, 2022, 12:58 PM IST

Updated : Oct 16, 2022, 2:12 PM IST

नवी दिल्ली: शनिवारी प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स (global hunger index) मध्ये भारताचा 121 देशांपैकी 107 वा क्रमांक आहे. रॅंकिग मध्ये भारताचा नंबर हा पाकिस्तान पेक्षाही खाली आहे. मात्र आता या रिपोर्टला केंद्र सरकारने नाकारले आहे. (central government reject GHI). एका निवेदनात केंद्र सरकारने म्हटले आहे की, हा निर्देशांक गंभीर समस्यांनी ग्रस्त आहे. यातील भुकेचे मापदंड चुकीचे आहेत.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जुलै 2022 मध्ये FIES (अन्न असुरक्षितता अनुभव स्केल) सर्वेक्षण मॉड्यूल डेटाच्या आधारावर असे अंदाज न वापरण्यासाठी हे प्रकरण अन्न आणि कृषी संघटनेकडे (FAO) नेण्यात आले होते. ते गुणवत्तेवर आधारित असणार नाही. अशा वस्तुस्थिती लक्षात न घेता ग्लोबल हंगर इंडेक्स अहवालाचे प्रकाशन हे खेदजनक आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, सततच्या या चुकीच्या रिपोर्ट्स मुळे भारतावर कलंक लागतो आहे. आपल्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा आणि पोषणविषयक गरजा पूर्ण न करणारे राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा निर्माण होते आहे. दरवर्षी चुकीची माहिती जारी करणे हे ग्लोबल हंगर इंडेक्सचे वैशिष्ट्य असल्याचे दिसते आहे

केंद्राने पुढे म्हटले की, निर्देशांकाच्या गणनेसाठी वापरल्या जाणार्‍या चारपैकी तीन निर्देशक मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत आणि ते संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणाचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा निर्देशक केवळ 3000 नमुन्यांवर आधारित आहे. हा अहवाल ग्राउंड रिअॅलिटीपासून डिस्कनेक्ट असून यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेषत: कोविड महामारीच्या काळात सरकारने केलेल्या कामांचा यात उल्लेख नाही आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, पीओयू व्यतिरिक्त इतर तीन निर्देशक जे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये समाविष्ट आहेत ते प्रामुख्याने मुलांशी संबंधित आहेत. हे निर्देशक पिण्याचे पाणी, स्वच्छता, अनुवांशिकता, पर्यावरण आणि उपासमार व्यतिरिक्त अन्न सेवन यासारख्या इतर विविध घटकांशी जोडलेले आहेत. उपासमारीवर आधारित गणना निर्देशक वैज्ञानिक किंवा तर्कसंगत नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 मध्ये भारत 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आहे. भारतात मुलांचा कुपोषणाचा दर 19.3 टक्के आहे, जो जगात सर्वाधिक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील भूक सर्वसमावेशकपणे मोजण्याचे आणि ट्रॅक करण्याचे साधन आहे. 29.1 च्या स्कोअरसह, भारतातील उपासमारीची पातळी "गंभीर" म्हणून लेबल केली गेली आहे. दक्षिण आशियामध्ये, अफगाणिस्तान हा भारताच्या मागे १०९ क्रमांकाचा देश आहे. शेजारी देश पाकिस्तान (99), बांगलादेश (84), नेपाळ (81) आणि श्रीलंका (64) या सर्वांनी भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

Last Updated : Oct 16, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.