ETV Bharat / bharat

Corona Patients : कोरोनाचा धोका! महाराष्ट्रासह चार राज्यांना केंद्र सरकारचे सतर्कतेचे आदेश - महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढली

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Apr 21, 2022, 12:46 PM IST

Updated : Apr 21, 2022, 12:57 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने या राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. ( Corona Patients Rise In Maharashtra ) केंद्र सरकारने मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम यांना कोरोना विषाणूचा संसर्ग कोठेही पसरू नये, म्हणून धोकादायक क्षेत्रात कडक लक्ष ठेवण्याची आणि आवश्यक असल्यास काही निर्बंध लागू करण्याचे पावले उचलण्याचीही सूचना केली आहे.

मास्क घालण्यावर विशेष भर देण्यात यावा - एका पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली आणि चार राज्यांना 'चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियमांचे योग्य पालन' या पाच-नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर विशेष भर देण्यात यावा असही त्यामध्ये म्हटले आहेत.

राज्यांनीही विषेश काळजी घ्यावी - कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्याच धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याचे आवाहन या पत्रात केंद्र सरकारने केले आहे. कोणत्याही स्तरावर या संसर्गाबाबद ढिलाई करता कामा नये. ज्या राज्यांना या संसर्गाचा धोका आहे, त्या राज्यांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. ते लक्षात घेता इतर राज्यांनीही विषेश काळजी घ्यावी असही यामध्ये म्हटले आहे.

बैठकीत सविस्तर चर्चा - आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराममधील सध्याच्या परिस्थितीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली, जिथे कोविड-19 ची प्रकरणे चिंताजनकरित्या वाढत आहेत.

217 नवीन प्रकरणे - आकडेवारीनुसार, मंगळवार संपलेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 693 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये सकारात्मक 0.39 टक्क्यांवरून 0.40 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशमध्ये, त्याच कालावधीत 217 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सकारात्मक 0.03 टक्क्यांवरून 0.09 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

हेही वाचा - British PM Visits India : ब्रिटनचे पंतप्रधान भारत भेटीवर; गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात

Last Updated : Apr 21, 2022, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.