ETV Bharat / bharat

उत्तराखंडच्या नेलॉन्ग खोऱ्यात चीनच्या सीमेला जोडणाऱ्या दोन रस्त्यांना केंद्राची मंजुरी

भारतीय लष्कर आता चीनच्या सीमेपर्यंत सहज पोहोचू शकणार आहे. कारण भारत सरकारने उत्तराखंडच्या नेलॉन्ग व्हॅलीमध्ये चीन सीमेला जोडणारे दोन महत्त्वाचे रस्ते बांधण्यास मान्यता दिली आहे (two road connecting China border ). गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाचा विषय रेंगाळला होता.

http://10.10.50.75:6060//finalout2/uttarakhand-nle/thumbnail/01-August-2022/15986399_12_15986399_1659360851957.png

author img

By

Published : Aug 2, 2022, 3:00 PM IST

डेहराडून: उत्तराखंड आणि देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलॉन्ग खोऱ्यात दोन महत्त्वाचे रस्ते बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे दोन रस्ते चीनच्या सीमेला जोडतात. दोन्ही रस्त्यांच्या निर्मितीमुळे भारतीय लष्कराला चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही माहिती दिली आहे.

  • मा. प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में देश की सीमाओं को सशक्त व सुरक्षित बनाया जा रहा है। इसी कड़ी में राज्य की चीन से लगती सीमा तक आवाजाही को सुगम बनाने हेतु उत्तरकाशी की नेलांग घाटी में सुमवा से थांगला तक व मंडी से सांगचौखला तक सड़क निर्माण को स्वीकृति दी गई है। pic.twitter.com/D3CmJv4TP1

    — Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या दोन्ही रस्त्यांसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री धामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सीमा मजबूत आणि सुरक्षित केल्या जात आहेत. या मालिकेत उत्तरकाशीच्या नेलॉन्ग खोऱ्यातील सुमवा ते थांगला आणि मंडी ते सांगचोखला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. जेणेकरून चीनच्या सीमेपर्यंत राज्याची वाहतूक सुलभ होईल. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि उत्तराखंडचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

वन्यजीव मंजुरी न मिळाल्याने सन 2020 पासून दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाचे काम रखडले होते. परंतु राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन्ही रस्त्यांच्या विषयावर चर्चा झाली, त्यानंतर बोर्डाने दोन्ही रस्त्यांना मंजुरी दिली. सुमला ते थंगला 11 किमी आणि मंडी ते सांगचोखला 17 किमी लांबीचा रस्ता तयार केला जाईल.

हेही वाचा - National Herald money laundering case: दिल्ली-मुंबईत नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीचे छापे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.