बंगळुरू - कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सीबीआयने समन्स बजावला आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत शिवकुमार यांना बंगळुरूमधील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे या समन्समध्ये नमूद केले आहे.
5 ऑक्टोंबरला डी. के. शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयने छापे
भष्ट्राचाराच्या आरोपांशी संबंधीत एका प्रकरणात सीबीआयने 5 ऑक्टोंबरला काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरांवर छापे टाकले होते. कर्नाटक, मुंबई आणि इतर काही ठिकाणांवर असलेल्या शिवकुमार यांच्या घरावरदेखील छापे टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी भाजपवर आरोप केले होते. भाजपने नेहमीच बदल्याचे राजकारण केल्याचे ते म्हणाले होते.
हेही वाचा - पंजाबमध्ये 23 नोव्हेंबरपासून रेल्वे सेवा सुरू; शेतकऱ्यांकडून सरकारला 15 दिवसांची मुदत
हेही वाचा - रांची : बुंडू शहरात पोस्टरबाजी करत माओवाद्यांची व्यापाऱ्यांना धमकी