ETV Bharat / bharat

Abu Salem fake passport case: बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमला सीबीआय कोर्टाचे समन्स

author img

By

Published : Aug 9, 2022, 12:25 PM IST

सीबीआय न्यायालयाच्या विशेष न्यायदंडाधिकार्‍यांनी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला समन्स बजावले आहे (Abu Salem fake passport case). नवी मुंबईतील तळोजा कारागृहात त्याला हे समन्स बजावले आहे. अबू सालेमवर बनावट पासपोर्टचा आरोप आहे.

बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमला सीबीआय कोर्टाचे समन्स

लखनऊ: बनावट नाव आणि पत्त्यावर पासपोर्ट बनवल्याच्या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या सीबीआय न्यायालयाच्या विशेष न्यायदंडाधिकारी समृद्धी मिश्रा यांनी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून समन्स बजावले आहे (Abu Salem fake passport case). या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी अबू सालेमच्या वकिलाने न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता की, अबू सालेमने आपल्या अनुपस्थितीत युक्तिवाद होऊ नयेत, असे म्हटले आहे. या कारणास्तव वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यास असमर्थता व्यक्त करत अबू सालेमला नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून बोलावण्याची विनंती न्यायालयाला केली. वकिलाची विनंती मान्य करत न्यायालयाने सहआरोपी परवेझ आलमच्या वकिलांना या कालावधीत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपी अबू सालेम अब्दुल कयूम अन्सारी याने त्याचे साथीदार परवेझ आलम आणि समीरा जुमानी यांच्यासोबत 1993 साली लखनऊ पासपोर्ट ऑफिसमध्ये कट रचला आणि अकील अहमद आझमीच्या नावाने अप्रामाणिक, फसव्या हेतूने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत बनावट नाव आणि पत्त्याची बनावट कागदपत्रे जोडली आणि पासपोर्ट मिळवला.

आरोपींनी हा बनावट पासपोर्ट खरा म्हणून वापरला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तपासानंतर, सीबीआयने आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले, ज्याची दखल घेत न्यायालयाने आरोपी अबू सालेमवर ५ जून २००९ रोजी आरोप निश्चित केले. त्यानंतर फिर्यादी पक्षाने आपल्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. या प्रकरणी सीबीआयने युक्तिवाद पूर्ण केला आहे.

हेही वाचा - Woman Killed Boyfriends Slitting Throat : बॉयफ्रेंडचा गळा चिरून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला, महिलेला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.