नवी दिल्ली - सीबीआयने किलो पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गुप्त तांत्रिक माहिती उघड केल्याप्रकरणी एका नौदल कमांडर अधिकाऱ्यासह दोन निवृत्त अधिकारी आणि इतर दोघांना अटक केली आहे. उच्च सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. नौदलाची माहिती लीक होण्यापासून रोखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी व्हाइस अॅडमिरल आणि रिअर अॅडमिरल यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय तपास पथकही तयार केले.
संबंधित यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने मुंबईत तैनात असलेल्या कमांडरला अटक केली. त्यांनी ही अनधिकृत माहिती निवृत्त अधिकाऱ्यांना लीक केली होती. अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर अनेक उपस्थित अधिकाऱ्यांचीही सीबीआय चौकशी करत आहे. केंद्रीय एजन्सीद्वारे करण्यात येत असलेल्या तपासाला नौदल मदत करत आहे. तपास यंत्रणेने गेल्या महिन्यात गुप्त कारवाई केली होती. या कारवाईत नौदलाचे दोन निवृत्त अधिकारी, एक कार्यरत अधिकारी आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. जन्सीने आतापर्यंत दिल्ली, मुंबई, हैदराबादमध्ये या प्रकरणाचा तपास केल्याचे सुत्रांनी सांगितले.
गुप्त अधिकारी नौदलाच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक; हेरगिरीचे आरोप - नौदल कमांडरला सीबीआयकडून अटक
किलो पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गुप्त तांत्रिक माहिती उघड केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली आहे. संबंधित यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने मुंबईत तैनात असलेल्या कमांडरला अटक केली. त्यांनी अनधिकृत माहिती निवृत्त अधिकाऱ्यांना लीक केली होती.