नवी दिल्ली Cash For Query Case : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आज कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकसभेच्या आचरण समितीसमोर हजर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. यानंतर चांगलंच राजकारण तापलंय. या प्रकरणाला आता वेग आला. भाजपा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या आचरण समितीकडे पाठवण्यात आलंय.
-
Just written to Hon’ble Speaker @loksabhaspeaker on serious issue of surveillance on Opposition members in violation of Constitutional freedoms & rule of law.@MamataOfficial @abhishekaitc @AITCofficial pic.twitter.com/tqmKpgkNew
— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just written to Hon’ble Speaker @loksabhaspeaker on serious issue of surveillance on Opposition members in violation of Constitutional freedoms & rule of law.@MamataOfficial @abhishekaitc @AITCofficial pic.twitter.com/tqmKpgkNew
— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 1, 2023Just written to Hon’ble Speaker @loksabhaspeaker on serious issue of surveillance on Opposition members in violation of Constitutional freedoms & rule of law.@MamataOfficial @abhishekaitc @AITCofficial pic.twitter.com/tqmKpgkNew
— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 1, 2023
आज लोकसभेच्या आचरण समितीसमोर होणार हजर : मंगळवारी खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितलं की, त्या गुरुवारी लोकसभेच्या आचरण समितीसमोर हजर होणार आहेत. यासोबतच त्यांनी कॅश फॉर क्वेरी प्रकरणातील आरोपांवर व्यापारी दर्शन हिरानंदानी आणि वकील जय अनंत देहद्राई यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली. त्याचवेळी, महुआ यांनी नीती समितीसमोर हजर राहण्यासाठी 5 नोव्हेंबरनंतरची तारीख देण्याची विनंती केली होती. परंतु, समितीनं त्यांची विनंती फेटाळली. त्यांना 2 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितलं. महुआंनी सांगितलं की जेव्हा त्या आचरण समितीसमोर येतील, तेव्हा सर्व खोटेपणा उघड करेल. मी एक रुपयाही घेतला असता तर भाजपानं मला आतापर्यंत तुरुंगात टाकलं असतं, असंही त्या म्हणाल्या.
महुआ यांनी समितीवर प्रश्न केले उपस्थित : टीएमसी खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, 2021 सालापासून या आचारण समितीची एकही बैठक झालेली नाही. समितीनं आदर्श आचारसंहिताही तयार केलेली नाही. महुआ म्हणाल्या की, माझ्यावर काही गुन्हेगारी आरोप असतील तर एजन्सींनी तपास करावा. आचरण समिती ही कोणाच्याही वैयक्तिक प्रकरणाची चौकशी करण्याची जागा नाही, असंही त्या म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोइत्राविरोधात चौकशीचं आवाहन केलं होतं. याशिवाय महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केलीय. महुआ मोइत्रा यांनी संसदेत सुमारे 61 प्रश्न विचारले, त्यापैकी 50 प्रश्न अदानी समूहावर असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हेही वाचा :