ETV Bharat / bharat

Urination In Flight : विमानात लघुशंकेच्या घटनेनंतर एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

author img

By

Published : Jan 5, 2023, 1:08 PM IST

Updated : Jan 5, 2023, 9:17 PM IST

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Indira Gandhi International Airport ) पोलीस ठाण्याचे पोलीस पथक विमानात एका वृद्ध महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. याप्रकरणी वृद्ध महिला प्रवाशाने लेखी तक्रार दिली होती. विमानात घाणेरडं कृत्य करणाऱ्या प्रवाशाला एक महिना प्रवासबंदी ( Passenger banned for one month ) केली आहे. ( Case Of Urinating On Elderly Female Passenger In Flight )

Air India Flight
लघुशंका करणाऱ्या प्रवाशाला गुन्हा दाखल

नवी दिल्ली : न्यूयॉर्क-दिल्ली विमान प्रवासादरम्यान एका वृद्ध महिला सहप्रवाशावर लघवी केल्याच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. (DDCA notice to air india). नोटीसमध्ये, कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल अंमलबजावणी कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. ही नोटीस जबाबदार व्यवस्थापक, इन-फ्लाइट सर्व्हिसेसचे संचालक, पायलट आणि केबिन क्रू यांना पाठवण्यात आली आहे.

एक महिन्याच्या चौकशीनंतर तक्रार दाखल : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर प्रवाशाने लघुशंका केल्याप्रकरणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Indira Gandhi International Airport ) पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने बुधवारी एफआयआर नोंदवला. या प्रकरणातील आरोपी प्रवाशासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. वृद्ध महिला प्रवाशावर लघुशंका करणारा आरोपी मुंबईचा रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, परंतु या प्रकरणी वृद्ध महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन ( Tata Group Chairman N Chandrasekaran ) यांना पत्र लिहून तक्रार केल्यावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या चौकशीनंतर डिसेंबर रोजी लेखी तक्रार दाखल केली. ( Case Of Urinating On Elderly Female Passenger In Flight )

एक महिन्यानंतर तक्रार दाखल : या प्रकरणाचा तपास करून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने बुधवारी गुन्हा दाखल केला. मात्र, ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली असताना व त्यादरम्यान महिला प्रवाशाने लेखी तक्रार दिली होती, मग एक महिन्यानंतर ही तक्रार पोलिसांत का करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणी डीजीसीए विमान कंपन्यांनाही नोटीस पाठवून प्रश्न विचारणार आहे, कारण क्रू मेंबर्सनीही गाफील राहिल्याचे दिसते. विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला विमान येत होते. लंचनंतर विमानातच एका प्रवाशाने वृद्ध महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना घडली. त्यामुळे त्यांचे कपडे, चपला आणि पिशवीही ओली झाली. पीडित वृद्ध महिलेने याबाबत क्रू मेंबर्सकडे तक्रार केली होती. ते गांभीर्याने न घेता दुसऱ्या जागेवर जाण्यास सांगितले, असा आरोप आहे.

चौकशी करण्यासाठी समिती स्थापन : ( Committee constituted to inquire ) इतकेच नाही तर नंतर वृद्ध महिलेला पुन्हा त्याच सीटवर बसण्यास सांगितले जेथे दुर्गंधी येत होती. बिझनेस क्लासमध्ये जास्त जागा रिक्त असतानाही पुन्हा त्याच सीटवर बसण्यास सांगण्यात आल्याचा आरोप महिला प्रवाशाने केला आहे. इतकेच नाही तर आरोपी प्रवासी दिल्ली विमानतळावर उतरल्यावरही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि त्याला आरामात बाहेर जाऊ देण्यात आले. हे प्रकरण गांभीर्याने घेत DGCA ने निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. या प्रकरणी मीडियाला माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ग्रुप सदस्यांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत आहे.

आरोपी हा मुंबईचा रहिवासी : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात वृद्ध महिलेवर एका इसमाने लघुशंका केल्याची संतापजनक घटना समोर घडली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध कलम 354,294,509,510 IPC अंतर्गत गुन्हा दाखल ( case has been registered against the passenger ) केला आहे. पीडित महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन ( Tata Group Chairman N Chandrasekaran ) यांच्याकडे तक्रार केली होती. आरोपी हा मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या अटकेसाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.शेखर मिश्रा असे आरोपीचे नाव ( Shekhar Mishra Accused ) असून त्याचे वय सुमारे 40-45 वर्षे आहे. याप्रकरणी एअर इंडियानेही या प्रवाशाविरोधात मोठी कारवाई करत त्याच्यावर 30 दिवसांची बंदी घातली आहे.

Last Updated : Jan 5, 2023, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.