ETV Bharat / bharat

Mass Conversion In Uttarkashi : नाताळच्या दिवशी सामूहिक धर्मांतरावरून गोंधळ, ख्रिश्चन मिशनऱ्यांवर गुन्हा दाखल - हिंदू संघटनांनी ख्रिश्चन मिशनरीविरोधात गदारोळ

उत्तराखंड मधील उत्तरकाशीच्या डोंगराळ जिल्ह्यात धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी ख्रिश्चन मिशनरीविरोधात गदारोळ केला. (mass conversion on christmas in uttarkashi). यादरम्यान पुरोळा शहरातही हिंदू संघटनांनी निदर्शने केली. (Mass Conversion In Uttarkashi). या प्रकरणी पोलिसांनी अनेक नामांकित व्यक्तीसह काही ख्रिश्चन मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (case against christian missionaries in uttarkashi).

Mass Conversion In Uttarkashi
Mass Conversion In Uttarkashi
author img

By

Published : Dec 25, 2022, 11:59 AM IST

नाताळच्या दिवशी सामूहिक धर्मांतरावरून गोंधळ

उत्तरकाशी (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये नाताळच्या दिवशी सामूहिक धर्मांतरावरून गदारोळ झाला आहे. (mass conversion on christmas in uttarkashi). याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018 अंतर्गत काही ख्रिश्चन मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (case against christian missionaries in uttarkashi). यात अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा भाजपसह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी मिरवणूक काढून धर्मांतराचा निषेध केला. त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. (Mass Conversion In Uttarkashi).

ख्रिश्चन मिशनऱ्यांवर गुन्हा दाखल
ख्रिश्चन मिशनऱ्यांवर गुन्हा दाखल

चक्का जाम करत कारवाईची मागणी : मिळालेल्या माहितीनुसार, पुरोळ्याला लागून असलेल्या देवधुंग परिसरात शुक्रवारी एनजीओच्या नव्याने बांधलेल्या इमारतीबाहेर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन मिशनरीशी संबंधित काही लोकांसह नेपाळी वंशाचे आणि स्थानिक लोकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. असा प्रकार घडल्याची कुजबुज होताच ग्रामस्थ आणि हिंदू संघटनांचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धर्मांतराचा आरोप करत गोंधळ घातला. हिंदू संघटनांनी सामूहिक धर्मांतराचा आरोप करत पोलिस आणि प्रशासनाकडे या प्रकरणाची तक्रार केली. हा गोंधळ इतका वाढला की, लोकांनी शहरात मिरवणूक काढून कुमोला तिराहे येथे चक्का जाम करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सिंह रावत यांच्या तहरीरवर नेपाळी वंशाच्या जगदीशसह काही ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : हिंदू संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरीब ग्रामस्थांना आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. काही लोकांनी धर्मांतराला विरोध केला असता आरोपींनी गावकऱ्यांना मारहाण करून गैरवर्तन केले. यात अनेक ग्रामस्थ जखमीही झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. याप्रकरणी सीओ बरकोट सुरेंद्र भंडारी यांनी सांगितले की, "हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र रावत यांच्या तक्रारीवरून उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018 अंतर्गत काही ख्रिश्चन मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे".

धर्मांतराचा सुधारित कायदा : उत्तराखंड सरकारने अलीकडेच धर्मांतर कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला आहे. उत्तराखंडमध्ये 2018 साली लागू करण्यात आलेल्या धर्मांतर कायद्यानुसार दोषीला 1 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि SC-ST च्या बाबतीत 2 ते 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होती. मात्र सुधारित कायद्यात 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दोषींना 50 हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो. नव्या कायद्यात पीडितेला भरपाई देण्याचीही तरतूद आहे. नवीन कायद्यानुसार बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला पीडितेला किमान ५ लाख रुपये द्यावे लागतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.