डेहराडून (उत्तराखंड) - मुसळधार पावसाने उत्तराखंडमध्ये हाहाकार केला आहे. मुसळधार पावसाने रस्त्यावर उभी असलेली कार वाहून गेली. सुदैवाने कारमध्ये प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. टिहरी गढवालमधील कीर्तीनगर ब्लॉकमध्ये सकाळपासून जनजीवन विस्कळित झाले आहे. डोबरा चाठी पुलाजवळ रस्त्यावर सर्व राडारोडा जमा झाला. रस्त्यावर उभी असलेली कार वाहून केली आहे. सुदैवाने या कारमध्ये कुणीही नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असते. मुसळधार पावसामुळे जुयालगढमधील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भूस्सखलन झाल्याने रस्त्याचे कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे, हेदेखील समोर आले आहे. याठिकाणी ५० वाहने अडकली आहेत.
हेही वाचा-इंधनावरील कराचे २५ लाख कोटींचे काय केले? अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार - मल्लिकार्जून खर्गे
दोन ते तीन दिवसांमध्ये मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता
पावसाने एवढी स्थिती खराब झाली की घटनास्थळी जेसीबी ही चार तास उलटूनही पोहोचू शकली नाहीत. हवामान विभागाने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १६९ रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार-
हिमाचल प्रदेशमध्ये मान्सूनने पुनरागमन केले असून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कांगडा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटन नगरी धर्मशालाच्या भागसूनाग परिसरात पाण्याच्या तेज प्रवाहामुळे रस्त्यावरील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. नाल्यांना आलेल्या पुरामुळे हॉटेल आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.