ETV Bharat / bharat

Canada Visa Service Suspend : भारत सरकारचा कॅनडाला झटका; कॅनडाची व्हिसा सेवा स्थगित

Canada Visa Service Suspend : दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप केले होते. यानंतर भारत सरकारनं कॅनडाला जोरदार झटका देत कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केलीय.

Canada Visa Service Suspend
Canada Visa Service Suspend
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 12:26 PM IST

Updated : Sep 21, 2023, 2:22 PM IST

नवी दिल्ली : Canada Visa Service Suspend : खलिस्तानवाद्याच्या हत्येवरुन भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारनं जोरदार झटका दिलाय. भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा बंद केलीय. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाइटवर याबाबत घोषणा करण्यात आलीय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलंय. कॅनडानं एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारतानंही जशास तसं उत्तर देत मंगळवारी एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. ही व्हिसा सेवा आजपासून (21 सप्टेंबर) पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलीय.

कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन : कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तेथील सर्व भारतीयांनी आणि कॅनडात प्रवासाचा विचार करणार्‍यांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं (Ministry of External Affairs) केलंय. तसंच भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या भारतीय समुदायाच्या वर्गांना अलीकडील काळात लक्ष्य केलंय. यामुळं भारतीय नागरिकांना अशा घटना घडलेल्या कॅनडातील प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलाय.

विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी : कॅनडामध्ये ढासळत चाललेलं सुरक्षा वातावरण लक्षात घेता, भारतीय विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगून सतर्क राहण्याचा सल्लाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिलाय. तसंच कॅनडातील भारतीय समुदायाची सुरक्षेसाठी भारतीय उच्चायुक्त आणि महावाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

कॅनडातील भारतीयांना नोंद करण्याचं आवाहन : कॅनडातील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित वेबसाइट किंवा MADAD पोर्टल madad.gov.in माध्यमातून ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीमुळं उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावास कोणत्याही आणीबाणीवेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधता येईल, असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. Khalistani Terrorist Killed In Canada : कॅनडामध्ये कथित खलिस्तानवादी गुंडाची हत्या, सुखविंदर सिंगला घातल्या गोळ्या
  2. Hardeep Singh Nijjar : प्लंबर ते कुख्यात खलिस्तानवादी; कोण आहे हरदीपसिंग निज्जर?
  3. Canada Accident: कॅनडामध्ये जेष्ठ नागरिकांना घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 15 ठार, 10 जखमी

Last Updated : Sep 21, 2023, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.