नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पखरियाल निशांक, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर अशा बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, घटनेप्रमाणे मंत्रिमंडळात मंत्र्यांची किती संख्या असावी याची मर्यादा आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एक दिवस राजीनामा दिला आहे. त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी निवड झाली आहे. राष्ट्रपती भवनच्या माहितीनुसार १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार स्वीकारले आहेत. या राजीनाम्यामुळे महत्त्वाची खात्यांवर मंत्र्यांच्या नियुक्ती करावी लागणार आहे.
काही मंत्र्यांना मिळणार बढती
किमान चार राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती मिळणार असल्याची चर्चा आहे. अथवा त्यांना स्वतंत्र मंत्रालयांची स्वतंत्र जबाबदारीही राज्यमंत्र्यांना दिली जाऊ शकते. या राज्यमंत्र्यांमध्ये अनुराग ठाकूर, मनसुख मांडवीय, जी. किशन रेड्डी आणि पुरशोत्तम रुपाला यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात पूर्णपणे बदल केला आहे.
हेही वाचा-मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
सुत्राच्या माहितीनुसार त्यांनी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बी. एल. यांच्याबरोबर प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय महासचिवदेखील होते. मंदावलेली अर्थव्यवस्था आणि कोरोना महामारी या कारणांनी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारसमोर आव्हाने निर्माण झाली आहे. कोरोना महामारीत देशात ४ लाखांहून अधिक लोकांचे मृत्यू जाले आहेत. तर देशाच्या जीडीपीत मागील तिमाहीत ७ टक्क्यांहून अधिक घसरण जाली आहे.
मंत्र्यांच्या संख्येवर घटनेप्रमाणे आहेत मर्यादा
२१ केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले ९ राज्यमंत्री आणि इतर २३ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसमवेत ५४ मंत्री आहेत. घटनेच्या ७२ व्या कलमान्वये, केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण मंत्री हे लोकसभेतील खासदार संख्येहून १५ टक्के असता कामा नये. सतराव्या लोकसभेत ५४० खासदार आहेत. तर अँग्लो इंडियनच्या दोन खासदारांच्या जागा रिक्त आहेत. घटनेतील ९१ व्या दुरुस्तीप्रमाणे १७ व्या लोकसभेतील स्थितीप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ८१ मंत्री असू शकतात. अशा स्थितीत पंतप्रधान हे कोणत्याही मंत्र्याला न वगळता आणखी २८ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करू शकतात.
आरोग्य, शिक्षण, दूरसंचार आदी महत्त्वाच्या विभागांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने हा केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार ठरत नाही. कारण, काही मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. तर काही जणांना बढती दिली जाणार आहे. सतराव्या लोकसभेत ५४० खासदार आहेत. घटनेतील ९१ व्या दुरुस्तीप्रमाणे १७ व्या लोकसभेतील स्थितीप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ८१ मंत्री असू शकतात. अशा स्थितीत पंतप्रधान हे कोणत्याही मंत्र्याला न वगळता आणखी २८ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करू शकतात.
आरोग्य, शिक्षण, दूरसंचार आदी महत्त्वाच्या विभागांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने हा केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार ठरत नाही. कारण, काही मंत्र्यांना कामगिरी समाधानकारक नसल्याने वगळण्यात आले आहे. तर काही जणांना बढती दिली जाणार आहे.