मुंबई : यावर्षी नागपंचमी (Nagpanchami 2022) मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. श्रावण शुक्ल पंचमी ही 'नागपंचमी' म्हणून ओळखली जाते. यावर्षी नागपंचमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि शिव आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, जो खूप फायदेशीर असेल. या दिवशी नाग देवतेच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी भगवान शंकराची (Lord Shankar) पूजा (By worshiping Lord Shankara) केल्याने कुंडलीतील काल सर्प दोषापासूनही (Kalsarp Dosh is removed from the horoscope) मुक्ती मिळते,अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने, व्यक्तीच्या कुंडलीतील राहू, केतू या ग्रहांच्या प्रभावापासून मुक्ती मिळते.
काल सर्प दोषापासून मुक्ती : ज्योतिष शास्त्रज्ञ डॉ. नवीनचंद्र जोशी यांच्या मते, नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि चांदीच्या नागाच्या जोडीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.
शुभ मुहूर्त: यंदा नागपंचमीच्या दिवशी सकाळी 6:05 ते सायंकाळी 5:55 पर्यंत, नागपंचमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. जो सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते; असे करने शुभ असते. नागपंचमीच्या दिवशी नागांची दूधाने पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी जो कोणी नागदेवतेच्या पूजेसोबत शिवाची पूजा करतो त्याची सर्व संकटे दूर होतात.
हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि शेतातील पिकांच्या रक्षणासाठी नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. नाग देवता हे भगवान शिवाच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंग देखील नागदेवतेला मानल्या जाते. या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सर्पदंशाचा धोका कमी होतो.
नागपंचमीच्या दिवशी घरातील मुख्य प्रवेश द्वारावर शेणाने नागाचा आकार तयार केल्यास, त्या घरात नागदेवता प्रसन्न होते. आणि त्या घरात कधीही साप येत नाहीत. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिपूर्वक पूजा केल्याने, व्यक्तीच्या जीवनातील काल सर्प दोषही दूर होतो.
पुराणानुसार, दिव्य आणि भौम असे दोन प्रकारचे साप सांगितले आहेत. दैवी नाग म्हणजे वासुकी आणि तक्षक, तो पृथ्वीचा भार वाहणारा आणि धगधगत्या अग्नीसारखा तेजस्वी आहे असे म्हटले जाते. जर ते रागावले तर ते संपूर्ण जगाला हिसकावून आणि केवळ दृष्टीक्षेपाने जाळून टाकू शकतात. त्यांच्या चाव्यावर कोणतेही औषध दिलेले नाही. ज्यांचा जन्म जमिनीवर होतो, ज्यांच्या दाढांमध्ये विष असते आणि जे मनुष्याला चावतात, त्यांची संख्या ऐंशी आहे.
अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापदम, शंखपाल आणि कुलिक - हे आठ सर्प सर्व सर्पांमध्ये श्रेष्ठ असल्याचे सांगितले जाते. या नागांपैकी दोन ब्राह्मण, दोन क्षत्रिय, दोन वैश्य आणि दोन शूद्र आहेत. अनंत आणि कुलिका - ब्राह्मण, वासुकी आणि शंखपाल - क्षत्रिय, तक्षक आणि महापदम - वैश्य आणि पद्म आणि कर्कोटक हे शूद्र आहेत, असे म्हटले जाते.
नागपंचमीच्या पूजेची पद्धत : नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल नावाच्या नागांची पूजा केली जाते. नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण करून पूजा करावी. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून सर्पदेवतेला अर्पण करा. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे. शेवटी नागपंचमीची कथा नक्की ऐका. शनीची साडेसाती किंवा वक्र दृष्टी एखाद्या व्यक्तीवर जात असेल, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध पाजावे. कारण शनि हा सापांचा कारक मानला जातो आणि भगवान शंकराच्या गळ्यात नाग असतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धातूपासून, बनवलेला नाग अर्पण केल्यास शनि साडेसातीचा वाईट परिणाम होत नाही.
हेही वाचा : Nag Panchami 2022 : कधी असते नागपंचमी? जाणून घेऊया शुभ काळ