टोकियो सात्विकसाईराज रँकीरेड्डी Satwiksairaj Rankireddy आणि चिराग शेट्टी Chirag Shetty या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. या जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जपानी जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी Takuro Hoki and Yugo Kobayashi यांचा पराभव केला. त्यामुळे आता या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये BWF World Championships भारताने पहिले पदक निश्चित केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकाच्या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी केली. त्यांनी विजेतेपदाच्या दावेदार आणि गतविजेत्या जपानी जोडीला 24-22, 15-21, 21-14 असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. यासह प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वत:साठी पदक निश्चित केले.
-
✅ First 🇮🇳 MD pair to secure a #BWFWorldChampionships medal
— BAI Media (@BAI_Media) August 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
✅ Only 2nd #WorldChampionships medal from 🇮🇳 doubles pair
✅ 13th medal for 🇮🇳 at World's@satwiksairaj & @Shettychirag04 script history yet again 😍#BWFWorldChampionships2022#BWC2022#Tokyo2022#IndiaontheRise pic.twitter.com/POW0uYt7KC
">✅ First 🇮🇳 MD pair to secure a #BWFWorldChampionships medal
— BAI Media (@BAI_Media) August 26, 2022
✅ Only 2nd #WorldChampionships medal from 🇮🇳 doubles pair
✅ 13th medal for 🇮🇳 at World's@satwiksairaj & @Shettychirag04 script history yet again 😍#BWFWorldChampionships2022#BWC2022#Tokyo2022#IndiaontheRise pic.twitter.com/POW0uYt7KC✅ First 🇮🇳 MD pair to secure a #BWFWorldChampionships medal
— BAI Media (@BAI_Media) August 26, 2022
✅ Only 2nd #WorldChampionships medal from 🇮🇳 doubles pair
✅ 13th medal for 🇮🇳 at World's@satwiksairaj & @Shettychirag04 script history yet again 😍#BWFWorldChampionships2022#BWC2022#Tokyo2022#IndiaontheRise pic.twitter.com/POW0uYt7KC
जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे दुसरे पदक निश्चित
जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे हे दुसरे पदक India second doubles medal in BWf आहे. यापूर्वी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने २०११ मध्ये महिला दुहेरीत पदक जिंकले होते. तत्पूर्वी, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांची विजयी मोहीम पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान या तीन वेळा सुवर्णपदक विजेत्या जोडीकडून पराभूत झाल्यामुळे संपली.
बिगरमानांकित भारतीय जोडीला तिसऱ्या मानांकित इंडोनेशियन जोडीकडून 30 मिनिटांत 8-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. या भारतीय जोडीने याआधी आठव्या मानांकित डेन्मार्कच्या किम एस्ट्रुप आणि अँडर्स स्कार्प रासमुसेन यांचा दुसऱ्या फेरीत पराभव केला होता.
हेही वाचा - Icc Odi Rankings शुभमन गिलने 45 स्थानांनी घेतली झेप, पहा वनडेची ताजी क्रमवारी