नवी दिल्ली : शनिवारी दुपारी प्रगती मैदान बोगद्यात चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर एका व्यावसायिकाची 2 लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. जिवे मारण्याची धमकी देत चोरट्यानी 2 लाख रुपये पळवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : गुजरातचे मेहसाणा येथील राहणारे साजन कुमार हे सोने- चांदीचे व्यापारी आहेत. ते शनिवारी दुपारी गुरुग्राम येथील एका संस्थेला 2 लाख रुपये देण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी जितेंद्र पटेलही होते. दरम्यान साजन कुमार आणि जितेंद्र पटेल यांनी लाल किल्ल्यापासून कॅब बूक केली होती. साजन कुमार हे रिंग रोडपासून प्रगती मैदानाजळील बोगद्याच्या जवळ आले. त्यांची कार बोगद्यात गेल्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चारजणांनी त्यांना थांबवले. या चोरांनी बंदुक दाखवून व्यापारी साजन कुमार यांच्याकडून दोन लाख रुपयांची बॅग हिसकावून घेतली. पैशांची बॅग घेऊन चोरट्यांनी पळ काढल्यानंतर साजन कुमार यांनी पीसीआरला कॉल करत या घटनेची माहिती दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लूट केल्याची घटना पूर्ण कैद झाली आहे. चार चोरटे दोन दुचाकींवर येतात आणि प्रगती मैदानाच्या बोगद्यात कार थांबवतात. त्यानंतर साजन कुमार यांना बंदुकीचा धाक दाखवत पैशांनी भरलेली बॅग घेऊन पळून जातात.
रेकी केल्याचा संशय : याप्रकरणाची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी तीन ते चार वाजता झाली होती. त्यानंतर व्यापाऱयाने सायंकाळी 6 वाजता पोलिसात याची तक्रार दिली. सध्या बोगद्याच्या आत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येत आहेत. लूट करणारे साजन कुमार यांचा लाल किल्ल्यापासून पाठलाग करत होते का, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. लुटमारीच्या या घटनेमागे कोणीतरी चोरटय़ांना माहिती दिल्याचा संशय आहे. व्यापारी साजन कुमार यांची त्यांनी रेकी करून ही लूट केली असावी शक्यता आहे. दरम्यान लाल किल्ला चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत.
राज्यपालांच्या राजीमान्या मागणी : ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एलजीकडे राजीनामा मागितला आहे. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर केंद्र सरकार दिल्लीला सुरक्षित करू शकत नसेल तर दिल्ली आमच्याकडे सोपवा. एखादे शहर तेथील नागरिकांसाठी सुरक्षित कसे बनवायचे ते आम्ही तुम्हाला दाखवू.
हेही वाचा -