ETV Bharat / bharat

Businessman Kidnapped :  महाराष्ट्रातील व्यावसायिकाचे खंडणीसाठी राजस्थानमध्ये अपहरण - A businessman was brutally beaten in a car

छत्रपती संभाजीनगर येथील व्यावसायिकाचे 15 लाखांच्या खंडणीसाठी राजस्थानमधील जयपूरमध्ये अपहरण करण्यात आले होते. नंतर बेदम मारहाण करून त्याला सोडून देण्यात आले आहे. जयपूरच्या मुहाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेख प्रज्वल मिठावाला असे या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Businessman Kidnapped
Businessman Kidnapped
author img

By

Published : May 30, 2023, 6:42 PM IST

जयपूर : राजधानी जयपूरमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असूनही, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून 15 लाखांची खंडणी मागितल्याची घटना जयपूर शहरात समोर आली आहे. इतकंच नाही तर चालत्या गाडीत व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

आरोपींनी काढला पळ : तसेच व्यापाऱ्याचे कपडे काढूण न्यूड व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर अपहरण कर्त्यांनी व्यापऱ्याला रस्त्यावरच सोडून पळ काढला आहे. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुहाना पोलिस स्टेशन पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असुन त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून खबऱ्यामार्फत चोरट्यांचा सुगावा घेणयाचे काम सध्या पोलीस करीत आहे.

5 लाख रुपयांची खंडणी : महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील लेख प्रज्वल मिठावाला यांच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुहाना पोलीस अधिकारी दिलीप सिंह यांनी सांगितले. प्रज्वल मिठावाला यांनी सांगितले की, आपण व्यवसायानिमित्त जयपूरला आलो होतो. 26 मे रोजी मानसरोवर परिसरातील हॉटेल ग्रीन ऑलिव्हमध्ये थांबलो होतो. दरम्यान, रात्री हॉटेलच्या बाहेर कारमध्ये आलेल्या तीन हल्लेखोरांनी मला त्यांच्या कारमध्ये बळजबरीने बसवले. त्यांनी मला गाडीतच बेदम मारहाण केली. तसेच माझी सुटका करण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप मिठावाल यांनी केला आहे.

नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : प्लॉटवर नेल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून पैसे हस्तांतरित करणे : चालत्या कारमध्ये मिठावाला यांना बेदम मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना निर्जन स्थळी नेले. तिथे हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टीही बांधली. हल्लेखोरांचा एक साथीदार आधीच प्लॉटमध्ये उपस्थित होता. त्यांनी मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करीत मीठावाल यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. बदमाशांनी त्याच्या UPI मधून 3400 रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना परत ते कारमध्ये बसवून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या बॅगेत ठेवलेले ४० हजार रुपये, दोन डेबिट कार्ड, एक चेक चोरट्यांनी हिसकावून घेतला. त्यानंतर चोरट्यांनी मीठावाल यांचे कपडे काढून त्यांचा नग्न व्हिडिओ बनवला. या बाबत कोठोही वाच्याता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे.

ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न : या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही तपासून चोरांचा कसुन शोध घेत आहेत. मुहाना पोलीस स्टेशन अधिकारी दिलीप सिंह यांनी सांगितले की, चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. माहिती देणाऱ्यांकडूनही माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचा -

Nagpur Suicide : नागपुरात तरुणाची आत्महत्या; 'हे' धक्कादायक कारण आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.