भोपाळ - मध्य प्रदेशातील कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या बससेवावरील बंदी वाढविली आहे. कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता सरकारने ही बंदी 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत कोरोनाची आढावा बैठक घेतली. कोरोनाबद्दल लोकांना जागरूक करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हावार कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भोपाळमध्ये मास्क न घालता भटकंती करणाऱ्या आणि सामाजिक अंतर न पाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लोकांमध्ये जनजागृतीची कामे सातत्याने केली जावीत आणि त्यांना मास्क वापरण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व केंद्रांवर लसीकरणाची गती वेगवान करण्यात यावी, असेही ते म्हणाले. इंदूर भोपाळ, जबलपूर, खरगोनमधील परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या ठिकाणी काही मायक्रो कंटेनमेंट झोन केले जावेत, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना कडक सूचना -
लसीकरण मोहीम आता युद्धपातळीवर वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूर येथे सुमारे 50 हजार लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याशिवाय इंदूरमधील इतर शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून येणाऱ्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देता येतील. स्थानिक पातळीवरही यासाठी तयारी करण्यात आली आहे. सध्या येथे 5 हजार 547 बेड आहेत. ज्यावर 3 हजार 506 रुग्ण दाखल आहेत. उर्वरित 2 हजार 191 बेड अजूनही रिक्त आहेत. मात्र, रुग्णांसाठी पुन्हा एकदा 10 हजार 000 बेडचे लक्ष्य गाठण्याची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय येत्या 10 दिवसात कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - बिग फाईट ! पश्चिम बंगालमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता-सुवेंदू थेट भिडणार