ETV Bharat / bharat

Building collapsed in Lucknow : लखनऊमध्ये बहुमजली इमारत कोसळली ; घटनास्थळी बचावकार्य जारी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील पॉश भाग असलेल्या हजरतगंजमधील अलाया अपार्टमेंट मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता कोसळली. अपार्टमेंटमध्ये 12 फ्लॅट असून, त्यात आठ ते दहा कुटुंबे राहत होते.

Building collapsed in Lucknow
लखनऊमध्ये बहुमजली इमारत कोसळली
author img

By

Published : Jan 25, 2023, 10:09 AM IST

घटनास्थळी बचावमोहीम जारी

लखनऊ : एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम राबवून सुमारे 14 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले असून यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जखमींच्या उपचारात कोणतीही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या.

घटनास्थळी बचावकार्य सुरू : मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हजरतगंजमधील बहुमजली अलाया अपार्टमेंट कोसळली. अपार्टमेंट कोसळल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली होती. लोकांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. अपार्टमेंटमध्ये 12 फ्लॅट असून, त्यात आठ ते 10 कुटुंबे राहत होते. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अत्याधुनिक मशिन्सच्या सहाय्याने मोहीम राबवून लोकांना वाचविण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि इतर पथकांनी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश अवस्थी, लखनऊ महापालिका आयुक्त इंद्रजित सिंह यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

सदनिकेचे बांधकाम बेकायदेशीर : वझीर हसन रोडवरील अलाया अपार्टमेंट याजदान बिल्डर्सने बांधल्याचे समोर आले आहे. या सदनिकेचे बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याची बाबही समोर आली आहे. इमारत बांधकामात एलडीएचेही दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. अपार्टमेंट बांधण्यासाठी निश्चित केलेल्या 2000 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळावर ही इमारत बांधण्यात आली आहे. अलाया अपार्टमेंट सुमारे 20 वर्षांत बांधली गेली आहे. एका छोट्या भूखंडावर बांधलेले हे अपार्टमेंट लखनऊ विकास प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचे उत्तम उदाहरण आहे. अपार्टमेंटच्या बांधकामाचा नकाशाही पास झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नातेवाईकांमध्ये शोककळा : घटनेनंतर अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. अपार्टमेंट कोसळल्यानंतर कोणीही बाहेर आलेले नाही. अपार्टमेंटबाहेर उपस्थित कुटुंबीय त्यांच्या कुटुंबीयांची माहिती गोळा करत आहेत. अपार्टमेंटसमोर उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, तिची आई शाहजहान या फ्लॅटमध्ये कामाला जात असे. ती कामासाठी घरून निघाली होती आणि अजून परतली नाही.

हेही वाचा : Building Collapsed In UP: लखनौत भूकंपाच्या धक्क्याने इमारत कोसळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.