ETV Bharat / bharat

Budget 2023: गेल्या आठ वर्षांत मेट्रोचे जाळे तीनपटीने वाढले - राष्ट्रपती

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यंदाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला अदानी-हिंडेनबर्ग वादासह इतर अनेक मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे.

President Droupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
author img

By

Published : Jan 31, 2023, 8:59 AM IST

Updated : Jan 31, 2023, 12:39 PM IST

हैदराबाद : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले पहिले भाषण देत आहेत. त्या म्हणाल्या की, आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. हा नव्या युगाचा नवा भारत आहे. आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

मेट्रोचे जाळे तिपटीने वाढवले : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, देशाचे विमान वाहतूक क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. यामध्ये उड्डाण नियोजनाचा मोठा वाटा आहे. भारतीय रेल्वे आपल्या आधुनिक अवतारात पुढे येत आहे आणि अनेक दुर्गम क्षेत्रे देशाच्या रेल्वे नकाशावर जोडली जात आहेत. सरकारने गेल्या आठ वर्षांत देशातील मेट्रोचे जाळे तिपटीने वाढवले आहे. सरकार गुलामगिरीच्या प्रत्येक खुणा, प्रत्येक मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पूर्वी जो राजपथ होता तो आता कर्तव्य मार्ग झाला आहे. मेड इन इंडिया मोहीम आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाचा लाभ देशाला मिळू लागला आहे. आज भारताची स्वतःची उत्पादन क्षमताही वाढत आहे आणि जगभरातून उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत.

डिजिटल इंडियाचे यश : त्या पुढे म्हणाल्या की, सरकारच्या नवीन उपक्रमामुळे आपली संरक्षण निर्यात सहा पटीने वाढली आहे. आयएनएस विक्रांतच्या रूपाने पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आज आपल्या सैन्यात सामील झाली आहे. त्या म्हणाल्या की, जनधन-आधार-मोबाईलपासून ते वन नेशन वन रेशन कार्डपर्यंत बनावट लाभार्थींना काढून टाकण्यापर्यंत आम्ही खूप मोठी सुधारणा केली आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल इंडियाच्या रूपाने देशाने कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था तयार केली आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली : मुर्मू म्हणाल्या की, सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्या आहेत. हाच वर्ग विकासापासून सर्वाधिक वंचित होता. आता मुलभूत सुविधा या वर्गापर्यंत पोहचू लागल्याने हे लोक नवी स्वप्ने पाहू शकतात. आदिवासींसाठी सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत. खाणकामापासून लष्करापर्यंतच्या सर्व सेवांमध्ये महिलांची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आज आपण 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेचे यश पाहत आहोत. देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली असून महिलांच्या आरोग्यातही पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे.

सरकारने भेदभाव न करता काम केले : त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, सरकारने सीमावर्ती गावांना चांगल्या सुविधा देण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामवर काम सुरू केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमावर्ती भागात गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. शिवाय या भागात विकासाला गती मिळते आहे. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आयुष्मान भारत योजनेने देशातील कोट्यवधी गरीब लोकांची मदत केली आहे. 7 दशकात देशातील सुमारे 3.25 कोटी घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन पोहोचले होते. जल जीवन अभियानांतर्गत 3 वर्षांत सुमारे 11 कोटी कुटुंबांना पाईपद्वारे पाणी जोडण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की, सध्याच्या सरकारने कोणताही भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम केले आहे. सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांचे परिणाम म्हणजे अनेक मूलभूत सुविधा एकतर १०० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या आहेत किंवा त्या उद्दिष्टाच्या अगदी जवळ आहेत.

आपचा अभिभाषणावर बहिष्कार : खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून उड्डाणांना उशीर झाल्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे इतर अनेक खासदार राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले. दुसरीकडे आम आदमी पक्षाने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे खासदार अभिभाषणाच्या वेळी संसद भवनाबाहेर राहतील. भारत राष्ट्र समिती देखील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. आपचे नेते आणि खासदार संजय सिंह म्हणाले की, आम्ही संसदेच्या संयुक्त अधिवेशनावर बहिष्कार टाकत आहोत कारण सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सिंह यांनी स्पष्ट केले की ते आणि त्यांचा पक्ष राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींच्या कार्यालयाचा आदर करतात, परंतु केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या निषेधार्थ अभिभाषणावर बहिष्कार टाकत आहेत.

विरोधकांची सरकारला घेरण्याची तयारी : यंदाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष केंद्र सरकारला अनेक मुद्द्यांवर घेरण्याची अपेक्षा आहे. अदानी-हिंडेनबर्ग वाद, बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्यामागील तर्क, देशव्यापी जात-आधारित आर्थिक जनगणनेची मागणी आणि महिला आरक्षण विधेयकावर चर्चा इत्यादी मुद्यांवरून संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्व मंत्र्यांना केंद्र सरकारच्या सर्व योजना देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. त्यासाठी तयारी सुरू करावी लागेल. मंत्र्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही आमच्या योजनांमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. सर्वांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत.

दोन टप्यात अधिवेशन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आपला पाचवा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष 36 विधेयके मांडणार आहे. त्यापैकी चार विधेयके अर्थसंकल्पीय अभ्यासाशी संबंधित आहेत. महिनाभराच्या विश्रांतीसह हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीला संपेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 12 मार्चला सुरु होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 66 दिवस चालणार असून त्यात एकूण 27 बैठका होणार आहेत.

संसदेच्या कॅन्टीनचा मेनू : अधिवेशनाच्या वेळी विश्रांतीदरम्यान खासदार संसदेच्या कॅन्टीनमध्ये नवनवीन मेनूंचा आस्वाद घेतात. या वेळी संसदेच्या कॅन्टीनमध्ये ज्वारीच्या उपम्यापासून नाचणीच्या डोस्यापर्यंत, तसेच टिक्की ते खिचडी देखील मिळणार आहे. सरकारने बाजरीच्या वापराला प्रोत्साहन दिल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रामुख्याने नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा आणि कंगणीसह बनवलेले पदार्थ सर्व्ह करण्याची व्यवस्था केली आहे. बाजरीचा मेनू संसद कर्मचारी आणि पाहुण्यांसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा : Budget 2023 : जाणून घ्या, यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीयांच्या काय आहेत अपेक्षा?

Last Updated : Jan 31, 2023, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.