ETV Bharat / bharat

काश्मिरातील बडगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक, पोलीस अधिकारी शहीद

काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक विशेष पोलीस पथकातील अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.

author img

By

Published : Feb 19, 2021, 8:38 AM IST

बडगाम चकमक
बडगाम चकमक

नवी दिल्ली - काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक विशेष पोलीस पथकातील अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सेंट्रल काश्मीरमधील बिरवाह झिंनगाम परिसरात ही चकमक झाली.

बिहवाह येथील झिंनगाम गावाला वेढा -

काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात चकमक

पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ दलाने संयुक्तरित्या मोहिम राबवली. शहीद झालेल्या विशेष पोलीस पथकातील अधिकाऱ्याचे नाव अल्ताफ अहमद असून ते चंदोरा येथील रहिवासी होते. तर दुसरा एक पोलीस जवान चकमकीत जखमी झाला आहे. मंजूर अहमद असे या जवानाचे नाव असून तो सोपोर येथील रहिवासी आहे. बिहवाह येथील झिंनगाम गावाला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला. सुरक्षा दले जवळ येताच संशयित दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.