चंदीगड - पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरू आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवरून घुसखोरी करताना तीन पाकिस्तानी अमली पदार्थ तस्करांना बुधवारी रात्री रोखले. सीमेवर संशयास्पद हालचाल सुरू होताच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी एका तस्कराला अटक करण्यात यश आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने गोळीबार केल्यानंतर दोन तस्कर पळून गेले आहेत. तर एका तस्कराला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून अमली पदार्थांचे दोन पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा-स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष नाण्याचे अनावरण
तस्करावर रुग्णालयात उपचार सुरू-
पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कर हे बीओपी सत्पाल पोस्टमधून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जवानाने गोळीबार केल्यानंतर एक तस्कर गंभीर जखमी झाला. त्याला पंजाब पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्यावर फिरोझेपूर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-दिल्लीत जोरदार पाऊस, मोडला 19 वर्षांचा रेकॉर्ड
तस्कर हा पाकिस्तानचा रहिवाशी-
फिरोझपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ चरणजित सिंग रंधवा म्हणाले, की अटकेतील तस्कराची ओळख पटलेली आहे. त्याचे अर्शद नाव आहे. तो पाकिस्तानमधील पट्टो कला जिल्ह्यातील कसूर शहराचा रहिवाशी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन